लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव ( प्रतिनिधी ) : ' धाकटी पंढरी ' श्रीक्षेत्र वरुर, ( ता. शेवगाव ) येथील श्रीविठ्ठल - रुक्मिणी मंदिर देवस्थानचे महंत तथा प्रसिद्ध भागवताचार्य दिनकर महाराज अंचवले यांच्या सुशील धर्मपत्नी सौ. अरुणाताई अंचवले ( वय ७९ ) यांचे आज बुधवारी सायंकाळी अहिल्यानगर येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. उद्या गुरुवारी ( दि. १३ रोजी ) सकाळी दहा वाजता वरूर येथे त्रिवेणी संगमावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पक्षात पती, दोन विवाहित मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
कुटुंबवत्सल व मितभाषी असलेल्या सौ. अंचवले या धार्मिक, मनमिळावू तसेच परोपकारी वृत्तीच्या होत्या. शेवगावच्या एडीसीसी ( मार्केटयार्ड शाखा ) बँकेचे शाखाधिकारी दिलीप अंचवले, आदर्श कन्या विद्या मंदिर प्रशालेचे सहशिक्षक मुकुंद अंचवले व गृहिणी विद्या हरिचंद्र भोपे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाबद्दल वरुर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या