Ticker

6/Breaking/ticker-posts

अरविंद केजरीवालांचा 'दारु'नं पराभव..!


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नवी दिल्ली : अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ला लोळविले असून 70 पैकी 48 जागांवर आघाडी घेतली आहे.  तर या निवडणुकीत आपचे सर्वेसर्वा केजरीवाल स्वतः अवघ्या 1200 मतांनी पराभूत झाल्याचे वृत्त हाती आले आहे. त्यामुळे केजरीवाल यांना 'दारु'नं  पराभवाला समोर जावं लागत आहे.

गेल्या दोन टर्म पासून केजरीवाल यांनी दिल्लीवर एकहाती वर्चस्व राखले होते. परंतु त्यांच्या शेवटच्या टर्ममध्ये त्यांचा दारू घोटाळा चांगला गाजला. त्यामुळे त्यांचा  दारु'नं पराभव केला, असे मानले जाते.

 70 जागा असलेल्या या विधानसभेत भाजपाने 48 जागांवर आघाडी घेत विजयाकडे घोडदौड सुरू ठेवली आहे.आपला मात्र अवघ्या 22 जागांवर आघाडी आहे.निकालाचा कल जाहीर झाल्यामुळे आपचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे.  सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे केजरीवाल यांना स्वतः 1200 मतांनी पराभवला सामोरे जावे लागल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सातत्याने भाजपला टक्कर देणाऱ्या केजरीवालाना यावेळी मात्र दारू भोवली अशी चर्चा रंगली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक व अरविंद केजरीवाल यांचे एके काळचे सहकारी अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना दारूमुळे पराभवाला सामोरे जावे लागले असल्याची रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या