पत्रकार परिषदेत घेतला आ.धस यांचा समाचार
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर : मस्साजोग येथील सरपंचाचा खून ही घटना निंदनीय आहे. परंतु आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यामध्ये विविध पदावर नोकरीला असलेल्या वंजारी समाज बांधवांच्या बिंदू नामावलीबद्दल जे वक्तव्य केले,तसेच ते सातत्याने समाजाबद्दल चालविलेला हा अपप्रचार अत्यंत विखारी आहे. ते हेतू पुरस्सर असे वक्तव्य करीत असल्याचे दिसते त्यास आमचा आक्षेप असून त्यातून नव्या पिढीचे नुकसान होणार आहे, अशी खंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अॅड. प्रताप ढाकणे यांनी व्यक्त केली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंचाच्या खून प्रकरणाबद्दल प्रकारांशी बोलताना ढाकणे यांनी आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या सुरू असलेल्या बेताल वक्तव्यांचा समाचार घेतला. तसेच त्यांनी वंजारी समाजातील नोकरदारांच्या बिंदू नामावलीचा विषय छेडला. तसेच त्यांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दुजेरा दिला. त्यातून वंजारी समाजाचे खच्चीकरण होत असल्याचे ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
ढाकणे पुढे म्हणाले दोन दिवसापूर्वी आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग घटनेशि काही संबंध नसताना एका विशिष्ट जातीचे लोक जिल्ह्यात काम करतात. त्यांना एनटी- ड मधून नोकरी, त्यांना ओबीसीमधून नोकरी, त्यांना ओपन मधूनही नोकरी मिळते. असे बेताल वक्तव्य केले. त्यास सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी दुजोरा दिला. आणि याच विषयाला माझा आक्षेप आहे.
राज्यघटनेने प्रत्येकाला अधिकार दिला आहे.त्या अधिकारानुसारच वंजारी समाजातील तरुण आज विविध क्षेत्रांमध्ये नोकरीवर आहेत. त्यांच्या कष्टाचा आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी हे यश मिळविले. परंतु काही विशिष्ट हेतू ठेवून अशा पद्धतीने विधान केले जाते. कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वंजारी समाजाबद्दल असे विधाने करणे एक प्रकारे समाजाला बदनाम करण्यासारखे आहे. त्यामुळे वंजारी समाजाबद्दल इतर समाज बांधवांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. आमदार सुरेश धस यांनी जाणीवपूर्वक अप प्रचार चालविला आहे.अशी टीका ढाकणे यांनी केली.
आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे कोणीही समर्थन करू शकत नाही.या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.ही घटना अत्यंत निंदनीय आणि माणूसकिला काळीमा फासणारी आहे. गुन्हेगारांना जात नसते, ती एक प्रवृत्ती असते.परंतु एखाद्या व्यक्तीमुळे संपूर्ण समाज बदनाम करणे चुकीचे आहे. अशी टिप्पणी त्यांनी केली.
त्याबद्दल पोटसुळ का?
आजही आमच्या समाजातील लोक ऊसतोडणीला जातात. आम्हाला कोणाच्या ताटातले हिसकावून घ्यायचे नाही, पण आमच्या हक्काचे जे आम्हाला मिळाले आहे ,त्याबद्दल यांना पोटसुळ का? असा इशारा देत आमदार सुरेश धस यांनी असे वक्तव्य कशाबद्दल केले असा खडा सवाल ढाकणे यांनी केला.
0 टिप्पण्या