आयुक्त पाठविणार प्रस्ताव; भौगोलिक दृष्ट्या समावेश योग्य नसल्याचा दावा
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर: भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नागरिक क्षेत्र अहिल्यानगर महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यासाठी केंद्र स्तरावरून अहवाल मागविला होता तसापी आता भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत समाविष्ट करण्यास महापालिका प्रशासनाने असमर्थता दर्शविली आहे भिंगार व अहिल्यानगर शहर सलग नाही त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या भिंगारचा महापालिकेत समावेश करणे योग्य ठरणार नाही, असा पवित्रा मनपा प्रशासनाने घेतला आहे.
देशातील सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्ड लगतच्या नगरपालिका क्षेत्रात किंवा महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यासंदर्भात केंद्र स्तरावरून हालचाली सुरू आहेत. तसा पत्रव्यवहार यापूर्वी झालेला असून क्षेत्रफळ लोकसंख्या मूलभूत सुविधांची परिस्थिती यांचा अहवाल शासनाने माधवीला होता. महापालिकेत भिंगार मधील सुमारे 131 एकर नागरिक क्षेत्र वर्ग करण्यासाठी महापालिकेची मंजुरी आवश्यक असल्याने फेब्रुवारी 2024 मध्ये महासभेकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र त्यावर निर्णय झाला नव्हता. तत्कालीन प्रशासकांनी प्रस्ताव सविस्तर माहिती सह फेरसादर करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार 31 डिसेंबर रोजी नगर रचना विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला मात्र आयुक्त यशवंत डांगे यांनी यावर निर्णय राखून ठेवला होता. मंगळवारी दिनांक सात रोजी आयुक्त यशवंत डांगे यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर भिंगार शहर अहिल्यानगर महापालिकेत समाविष्ट करणे योग्य ठरणार नाही. भिंगार शहर हे अहिल्यानगर शहराशी संलग्न नाही भिंगारची भौगोलिक सलगता नागरदेवळे गावाशी आहे त्यामुळे भिंगार महापालिकेत समाविष्ट करणे योग्य होणार नाही, असा निर्णय प्रशासनाने तुर्त घेतला आहे.
भिंगार हद्दीलगत नागरदेवळे वडारवाडी ग्रामपंचायत आहेत त्याच नगर शहरापासून भिंगार दोन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या भिंगार शहर महापालिका हद्दीत समावेशित करणे संयुक्तिक ठरणार नाही तसा ठराव महापालिका करणार आहे.
-यशवंत डांगे
आयुक्त तसा प्रशासक
देशातील सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्डाला लगतच्या महापालिकेत समावेशित करण्याचा केंद्राचा निर्णय झालेला आहे त्यामुळे स्थानिक स्तरावर काहीतरी निर्णय झाला तरी उपयोग नाही काहीही निर्णय झाला तरी उपयोग नाही. तरीही भिंगारचा महापालिकेत समावेश होणे गरजेचे आहे. ब्रिटिशकालीन नियमावलीला नागरिक वैतागले आहेत.
-वसंत राठोड
माजी उपाध्यक्ष भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड
0 टिप्पण्या