विजेत्यास मिळणार चांदीची गदा व चारचाकी गाडीही : आ.संग्राम जगताप
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६७ व्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब २०२४-२५ लढत अहिल्यानगर शहरात होत आहेत. येत्या २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान नगरच्या वाडियापार्क मैदानात या कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. अहिल्यानगरला या सर्धेचे यजमानपद मिळाल्याचा आनंद माझ्यासह सर्व कुस्तीगीरांना झाला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अंतिम विजेत्यास रोख परितोषिक, मानाची चांदीची गदा या बरोबरच माझ्या वतीने चारचाकी गाडीही देण्यात येणार आहे, अशी माहिती अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
अहिल्यानगरमध्ये होणार्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धच्या आयोजनाची माहिती आमदार जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे, सरचिटणीस हिंद केसरी पै. योगेश दोडके, उपाध्यक्ष पै. अर्जुन शेळके, महाराष्ट्र केसरी पै. अशोक शिर्के, महाराष्ट्र केसरी पै. गुलाब बर्डे, सचिव प्रा.डॉ.पै.संतोष भुजबळ, सहसचिव पै.प्रविण घुले आदींसह सर्व पदाधिकारी, शहर व जिल्ह्यातील सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी यांच्या उपस्थित होते. यावेळी स्पर्धेच्या लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले.
आ. संग्राम जगताप पुढे म्हणाले, नगर जिल्ह्याला कुस्ती क्षेत्रात फार मोठा वैभवशाली वारसा व परंपरा आहे. तो वारसा आता पुढे नेत नव्या मल्लांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून काम केले जात आहे. शहरी व ग्रामीण भागातील युवकांना लाल मातीशी जोडण्यासाठी या क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या क्षेत्राला अधिक बळकटी व सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे.
यावेळी पै. संदीप भोंडवे म्हणाले, या स्पर्धेतील विजेत्याची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड होणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी माती व गादी या दोन्ही प्रकारांमध्ये फेर्या होणार असून माती विभागातील अंतीम विजेता व गादी विभागातील अंतिम विजेता यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबसाठी अंतिम लढत गादीवर होणार आहे. विजेत्यास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्या वतीने मानाची चांदीची गदा देण्यात येणार आहे. येणार्या सर्व मल्लांची निवासाची चांगली व्यवस्था संयोजक करत आहेत. ही सपर्धा सकाळी ७ ते १० व दुपारी ४ ते रात्री ८:३० या वेळेत असून मंत्री मुरलीधर माहोळ व मंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून नाडा संस्थानाही नगरला बोलावण्यात येत आहे. अर्जुन शेळके म्हणाले, स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार केंद्रीय राज्य मंत्री पै. मुरलीधर मोहोळ, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंगल, आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खसदार रामदास तडसआदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन निलेश मदने यांनी केले. प्रवीण घुले यांनी आभार मानले. यावेळी उपमहाराष्ट्र केसरी बापू थेटे, उपमहाराष्ट्र केसरी अनिल गुंजाळ, पै बाळासाहेब वाघ, पै शंकर खोसे, पै धनंजय खोसे, पै सुरेश आंबेकर, पै सोमनाथ राऊत, प्रमोद गोडसे, उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज करंजुले, पै संजय शेळके, पै मिलिंद जपे, पै अशोक घोडके, बंडू शेळके, पै उमेश भागानगरे, पै अनिल वाणी, अनिल वाघ, पै दिलीप झिंजुर्डे, पै महेश लोंढे, निलेश मदने, यश मदने, शौर्य मदने, पै स्वप्नील भुजबळ, पै मनोज शिंदे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या