Ticker

6/Breaking/ticker-posts

कौन बनेगा करोडपतीमधून बोलतोय म्हणत गंडा घालणारा भामटा जेरबंद..!

नगरच्या सायबर पोलिसांनी आरोपीला कल्याणमध्ये घातल्या बेड्या






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहिल्यानगर ः  ङ्गकौन बनेगा करोडपतीफमधुन बोलतोय तुम्हाला २५ लाखाची लॉटरी लागली आहे असे सांगुन विविध प्रोसेसिंग फीच्या नावावर नगरमधील एकाची १ लाख ३३ हजार २०० रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणार्‍या आरोपीस सायबर पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. फैसल ईकबाल मेमन (रा. कल्याण, ठाणे) असे आरोपीचे नाव असून त्याला राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले आहे.


नगर मधील नारायण अरुणे (रा. लक्ष्मी माता मंदिर जवळ, रामवाडी, सर्जेपुरा) यांना या आरोपीने मोबाईल वर कॉल करून तसेच व्हॉटसऍप कॉलवरुन कॉल करुन त्यांचा विश्वास संपादन करत २५ लाखाची लॉटरी लागली आहे असे सांगुन विविध प्रोसेसिंग फी चे नावाखाली दि. २० ऑगस्ट २०२१ ते १० मार्च २०२२ या कालावधीत फोन पे वर सुमारे १ लाख ३३ हजार २०० रुपये पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क टाळत फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.


या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपीचा मोबाईल नंबर, बैंक अकांऊट वरुन आरोपी फैसल मेमन याचे नाव तांत्रिक विश्लेषणाव्दारे निष्पन्न झाले. आरोपीचा शोधार्थ वेळोवेळी कल्याण ठाणे येथे जाऊन शोध घेतला असता आरोपी हा मिळुन आला नाही तदनंतर तांत्रीक विश्लेषणाव्दारे आरोपीचा शोध घेतला असता तो सोमवारी सायबर पोलिसांच्या पथकाला सापडला. पथकाने त्याला अटक केली आहे. सदरची कारवाई सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार अभिजीत अरकल, मल्लिकाअर्जुन बनकर, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, अरुण सांगळे, महिला अंमलदार सविता खताळ, दिपाली घोडके यांनी केली आहे.


नागरिकांनी अमिषाला बळी पडू नये

कौन बनेगा करोडपतीमधून आपणास २५ लाख रुपयेची लॉटरी लागली आहे, क्रेडिट कार्ड ऍक्टीव्हेशन करुन देतो, ऑनलाईन केवायसी पडेट करुन देतो, पेट्रोल पंप एजन्सी देतो, ट्रेडिग ऍप डाऊनलोड करुन जास्त प्रमाणामध्ये परतावा देतो, असे वेगवेगळया आमिषाला बळी पडु नये. प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करतांना काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणुक झाल्यास तत्काळ सायबर क्राईम पोर्टल हेल्पलाईन नंबर १९३० यावर तक्रार करावी,असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या