Ticker

6/Breaking/ticker-posts

शेगावमध्ये 'टक्कल व्हायरस'चं थैमान..!



अवघ्या 3 दिवसांत पूर्ण टक्कल ; नागरिकांनी घेतला व्हायरसचा धसका

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
बुलढाणा  :    नागरिकांच्या डोक्याला खाज सुटते आणि केस गळायला लागतात. त्यानंतर काही दिवसात टक्कल पडत असल्याचं समोर आलं आहे. बुलढाण्यात टक्कल व्हायरसनं थैमान घातलंय. काही दिवसात ४० ते ५० लोकांना टक्कल पडलंय. नागरिकांच्या डोक्याला खाज सुटते आणि केस गळायला लागतात. यानंतर काही दिवसात टक्कल पडत असल्याचं समोर आलंय.

शॅम्पू वापरणाऱ्या लोकांचे टक्कल पडत असल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय. पण ज्यांनी शॅम्पू कधीच वापरला नाही, त्यांचेही अचानक केस गळती झाल्याचं दिसून येत आहे.

  शेगाव तालुक्यातील तीन गावात जवळपास ५० हून अधिक व्यक्तींना अचानक केसगळती झाली आहे. बोंडगाव, हिंगणा, कालवडसह तीन गावात टक्कल पडतंय. पुरुषांसह महिलांचाही यामध्ये समावेश आहे.  या व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या टक्कल  व्हायरसचा धसका निर्माण झाला आहे. 


अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने रहिवाशी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

तिन्ही गावातील अनेक व्यक्तींचे केस एकाएकी कमी होऊन गळून जात आहेत. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या 3 गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या