लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पाथर्डी: राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे आमच्यासाठी लकी आहेत. ते यंदा शंभर टक्के निवडून येणार आहेत, राज्यात पुन्हा भाजप महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवाजीराव कर्डिले यांच्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन लोकनेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी केले.
राहुरी- नगर - पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ आ. पंकजा मुंडे यांनी शिराळ चिचोंडी येथे जाहीर सभा घेतली.यावेळी माजी खासदार डॉ .सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, श्रीगोंद्यातील भाजपचे उमेदवार विक्रम पाचपुते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, युवा नेते अक्षय कर्डिले, राजू शेटे, सुरेश बानकर, अशोक सावंत,मृत्युंजय गर्जे ,दिलीप जठार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, मतदार संघ पुनर्रचनेत तुकडे झाले त्यामुळे माझे राजकारण संपले असे वाटले. मात्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी 2009 मला भाजपची उमेदवारी दिली व मी आमदार झालो. त्या माध्यमातून राहुरी मतदार संघातील नागरिकांना विकास काय असतो हे दाखवून दिले. तीस वर्षापासून सुरू असलेल्या जनता दरबारामध्ये कोणीही प्रश्न घेऊन येतात आणि ते मी सोडवितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक रुपया पिक विमा काढला आणि लाखो रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. विविध योजनांचा आढावा घेतला.
माजी खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले की, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना निवडून द्या. कर्डिले साहेब तुम्ही कसलीच काळजी करू नका; योग्य वेळी सर्व पोहोच होईल.पंकजा ताईसारखे नेतृत्व आपल्याला लाभले आपले भाग्य आहे.
भविष्यकाराकडे जाण्याची गरज नाही
माजी मंत्री कर्डिले म्हणाले आमदार मंत्री असताना देखील मागील पाच वर्षात मतदार संघात विकास कामे करता आली नाहीत आणि आता महायुती सरकारने निधी देताना भेदभाव केला म्हणून आपली निष्क्रियता झाकण्याचे काम विरोधी उमेदवार करत आहेत मी आमदार नसताना देखील पाच वर्षे मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात राहिलो विकास कामे देखील महायुती सरकार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून केली.माझ्या कामामुळे व जनसंपर्कमुळे एवढा मोठा जनसमुदाय समोर उपस्थित आहे त्यामुळे विजयाची खात्री निश्चित आहे त्यासाठी कोणत्याही भविष्यकाराकडे आता जाण्याची गरज राहिली नाही असा विश्वास व्यक्त करत कर्डिले यांनी आमदार तनपुरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
आता 23 नोव्हेंबरलाच बोलू..
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले उगाच एखाद्या व्यक्तीवर बोलून त्याचे महत्त्व वाढवण्याची गरज नाही. आपल्या कामाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व महायुतीचे उमेदवार निवडून येतील त्यामुळे 23 नोव्हेंबरला कामातून बोलू. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जनतेच्या सेवेसाठी सक्रिय होणार असल्याचे संकेत डॉ. विखे पाटील यांनी यावेळी देताच उपस्थितांनी देखील जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले.
0 टिप्पण्या