लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
टाकळीमानुर : माजी केंद्रीय मंत्री स्व. बबनराव ढाकणे यांनी या भागात नाला बल्डिंग पाझर तलाववाचे भरीव विकास कामे केल्यामुळे टाकळीमानुर गटासह
पूर्व भाग आज बागायत आहे. अॅड. प्रतापराव ढाकणे तीन विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन सुद्धा सर्वसामान्य जनतेसाठी 35 वर्ष संघर्ष करत आहेत. त्यांना विधानसभेच्या या शेवटच्या निवडणुकीत साथ देऊन विधानसभेत पाठवावे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. प्रतापराव ढाकणे यांच्या प्रचारार्थ टाकळीमानुर गटातील कारेगाव, धायतडकवाडी, पांगुळ पिंपळगाव टप्पा, जोगेवाडी आदी गावांमध्ये संवाद यात्रेत ढाकणे बोलत होत्या.
ढाकणे पुढे म्हणाल्या की, या भागातील घाटशीळ पारगाव, बेलपरा, कुत्तरवाडी, मोहरी तलाव छोटे छोटे मोठे पाझर तलाव नाला बल्डिंग केल्याने या भागामध्ये बागायत क्षेत्र दिसत आहे. स्व. ढाकणे साहेबांनी केलेल्या भरीव, दीर्घकालीन कामांमुळे हा भाग नंदनवन बनवले आहे. यापुढील काळात या भागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी संघर्षशील व अभ्यासू नेतृत्व प्रतापराव ढाकणे यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन प्रभावती ढाकणे यांनी केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य उज्वला शिरसाट, सुमन खेडकर, रत्नमाला उदमले, प्रणाली ढाकणे, आरती निराळी, अरुणा केदार, डॉ. राजेंद्र खेडकर ,वसंत खेडकर, अर्जुन धायतडक, राजेंद्र नागरे, पांडुरंग शिरसाट ,आजिनाथ खेडकर, महादेव दहिफळे, दादासाहेब बारगजे, विजय शिरसाठ आदी उपस्थित होते .
0 टिप्पण्या