Ticker

6/Breaking/ticker-posts

२२२, शेवगाव - पाथर्डी विधानसभा क्षेत्रात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

                                 
 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव ( विशेष प्रतिनिधी ) : २२२, शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील ३६८ मतदान केंद्रावरील मतमोजणी शनिवार दि. २३ रोजी सकाळी आठ वाजता सुरू होत असून, मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. ईव्हीएम मतमोजणी टेबल संख्या १४ आहे. तर, मतमोजणी फेरी संख्या २७ आहे. मतमोजणीसाठी ३३ पर्यवेक्षक तसेच ५१ मतमोजणी सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे. टपाली मतमोजणीसाठी टेबल संख्या १० आहे. ईटीपीबीएस स्कॅनिंग करता ४ टेबल आहेत. स्ट्रॉंगरूम भोवती तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत सांगडे व उद्धव नाईक यांनी दिली. 

                                         
मतदार संघात १ लाख ९४ हजार ७४२ पुरुष, १ लाख ७९ हजार ६९४ महिला तसेच इतर ६ अशा एकूण ३ लाख ७४ हजार ४४२ मतदारांपैकी १ लाख ३७ हजार ६१३ पुरुष, १ लाख २२ हजार १०५ महिला व इतर ४ अशा एकूण २ लाख ५९ हजार ७२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाची एकूण टक्केवारी ६९.३६ टक्के आहे.                

मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी १ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३ पोलीस निरीक्षक, ९ पोलीस उपनिरीक्षक तसेच २०० पोलीस कर्मचारी अशी तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्ट्रॉंगरूम भोवती सीआरपीएफ चा एक प्लॅटून, एसीपी गोवा राज्य प्लॅटून, १५ पोलीस व २ पोलीस अधिकारी अशी सुरक्षा व्यवस्था आहे. तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तसेच मागच्या बाजूस पेट्रोलिंग व गार्ड तैनात करण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या