Ticker

6/Breaking/ticker-posts

भाजपाने उगारला बंडखोरांवर कारवाईचा बडगा..! नगरच्या दोघांची हकालपट्टी



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : अहिल्या नगर: माघारीसाठी मनधरणी करूनही अर्ज माघारी न घेणार्‍या राज्यातील  ४०  बंडखोरांवर  अखेर  भाजपकडून  कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये  अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन बंडखोर उमेदवारांची हाकालपट्टीची  करण्यात आली आहे.

 पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने  पक्षाकडून हाकालपट्टीची कारवाई केली आहे. यामध्ये  सुवर्णा पाचपुते (श्रीगोंदा) व बाळासाहेब मरकुटे (नेवासा) यांचा समावेश आहे. सुवर्णा पाचपुते यांनी भाजपा उमेदवार विक्रम पाचपुते यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी केली आहे तर नेवासा मतदारसंघातून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी 'प्रहार'तर्फे उमेदवारी करून पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. 

 विधानसभा निवडणुकीत उमेदवार देताना पक्षाने काही ठिकाणी विद्यमान आमदाराला पुन्हा संधी दिली आहे तर काही नव्या उमेदवारांची शिंदे गटाकडून निवड केली होती. मात्र त्यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन न करता अर्ज मागे घेण्यास नकार दिला त्यामुळे त्यांना थेट घरचा रस्ता दाखविला आहे.

माघारीसाठी मनधरणी करूनही विद्रोह  करणार्‍या राज्यातील  ४०  बंडखोरांवर  भाजपकडून  कारवाईचा बडगा उगारला आहे. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने  पक्षाकडून हाकालपट्टीची कारवाई केली आहे. यामध्ये श्रीगोंदा सुवर्णा पाचपुते, नेवासा – बाळासाहेब मरकुटे यांच्यासह एकूण 40 जणांवर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या