पाथर्डी : .बुधवारी सहा वाजता शिरसाटवाडी ( ता.पाथर्डी ) येथील मतदान केंद्रावर आमदार मोनीका राजळे यांचेवर भ्याड हल्ला केल्याचे निषेधार्थ कासार पिंपळगाव येथे गाव बंद ठेवुन निषेध सभा घेण्यात आली.
संपुर्ण गावांचे गल्लीबोळातुन मुक फेरी काढण्यात आली. समाजकंटकी प्रवृत्तीचे विरोधात दिलेल्या उस्फुर्त घोषणांनी ग्रामस्थांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सेवा संस्थेचे अध्यक्ष वसंतराव भगत म्हणाले,लोकशाही मान्य नसलेली ही प्रवृत्ती आहे. आपल्याला मतदान होत नसल्याचे रागातुन हे कृत्य झाले आहे. एका महिलेला मिळालेली ही वागणुक माणुसकीला काळीमा फासणारी आहे.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास म्हस्के म्हणाले,राजळे कुटुंब शालीनता जपत राजकारण करीत आहे. कोणावरही टीकाटिपण्णी न करता केवळ केलेली विकासकामे पक्षीय ध्येयधोरणे सांगत केलेला प्रचार,प्रसाराने मिळालेला जनाधार विरोधकांना रुचत नाही,हे दुर्दैव आहे.
घटनास्थळी अंगरक्षक असलेले अनिल औताडे यांनी तेथील उद्रेकाची संभाषणे, दगडफेक, विद्युत प्रवाह खंडीततेचा घटनाक्रम सांगितल्याने अनेक महिलांच्या डोळ्यात अश्रु तरळले. संभानाना राजळे, सुनील राजळे, सुनील मरकड, अनंत राजळे आदींनी भावना व्यक्त केल्या. ग्रामस्थांनी हात उंचावुन प्रसंगी निषेधाच्या घोषणा दिल्या. गावांतील बाराबलुते व्यवसाय, किराणा दुकानासह शेतीउपयोगी कामेही दिवसभर बंद ठेवण्यात आले.
0 टिप्पण्या