लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
टाकळीमानुर :
कोविड सारख्या जागतिक संकटाच्या काळात मावळते आमदार कुठेही फिरकले नाहीत मात्र माझे पती प्रतापराव ढाकणे यांनी बोधेगाव व पाथर्डी येथे दोन कोविड सेंटर सुरू केले त्यातून हजारो रुग्णांना जीवनदान मिळले. परिसरात स्वर्गीय बबनराव ढाकणे यांच्यानंतर एकही भरीव काम होऊ शकलेले नाही त्यामुळे त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांनी केले.
अकोले पंचायत समिती गणात मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी जि. प. माजी सदस्य उज्वला शिरसाट, प्रणाली ढाकणे, रत्नमाला उदमले ,आरती निराळी, ज्योती जेधे, डॉ. उषा जायभाय, मनीषा ढाकणे, आबा जायभाय, श्रीराम फुंदे ,बाळासाहेब घुले,आदी उपस्थित होते.
अकोले पंचायत समिती गणातील तनपुरवाडी, वाळुंज, आगस खांड, फुंदे टाकळी, पिंपळगाव, बडेवाडी, येळी, ढाकणवाडी, आदी भागांमध्ये प्रचार दौऱ्यात मतदारांशी गाठी-भेटी सुरू आहेत.
यावेळी ढाकणे म्हणाल्या की ,तालुक्याच्या विकासाचे फक्त आकडे दाखवले जातात. प्रत्यक्ष तालुक्यातील तेच रस्ते, तेच पाझर तलाव, तेच नाला बल्डिंग आहेत. लोकप्रतिनिधींनी त्यातील गाळ सुद्धा काढलेला नाही. कोविड सारख्या महामारीत सुद्धा लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडलं.मात्र माझे पती अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी दोन कोविड सेंटर सुरू करून जनतेला आधार देण्याचं काम केलं.
0 टिप्पण्या