लोकनेता न्यूज
अहिल्यानगर ः अहिल्यानगर शहर मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच निर्णायक आघाडी घेत विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवीत टॅटट्रिक साधली आहे. महायुतीचे आमदार जगताप यांनी विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना .. मताधिक्क्याने दणदणीत पराभव केला. विजयानंतर जगताप समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत, गुलाल उधळून एकच जल्लोष केला. आमदार जगताप यांना १ लाख १७ हजार ५५ तर कळमकर यांना ७८ हजार २५५ एवढी मते मिळाली. जगताप यांनी तब्बल ३९ हजार ६५० मताधिक्क्याने विजयावर मोहर उमटवली. कमकर यांचा दारूण पराभव झाला आहे.
शहर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी ७ वाजता उमेदवारांचे प्रतिनिधी व निवडणुक निर्णय अधिकारी, प्रमुख अधिकार्यांच्या उपस्थितीत मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला. सर्वप्रथम टपाली मतदान मोजण्यात आले. येथेही जगताप यांनी आघाडी घेतली. त्यानंतर पहिल्या फेरीचा निकाल साधारणतः ९ वाजण्याच्या सुमारास बाहेर आला तेंव्हा जगताप यांनी २५७२ मतांची आघाडी घेतली. ही आघाडी सातत्याने वाढतच गेली. त्यामुळे जगताप समर्थकांमधून आनंद व्यक्त केला जात होता. सातव्या फेरीपासून कळमकर यांनी आघाडी घ्यायला सुरूवात केली. परंतु ती ९ व्या फेरीतच आटोपली. १० फेरीपासून पुन्हा आ. जगताप यांनी आघाडी घेत शेवटच्या फेेरीपर्यत ती वाढत गेली. त्यामुळे कळमकर यांचा पराभव निश्चित झाला.
२१ व्या फेरीअखेर आ. जगताप यांना १ लाख १६ हजार १३१ एवढे तर कळमकर यांना ७७ हजार २०७ एवढी मते मिळाली होती. आ. जगताप यांनी कळमकर यांच्यावर तब्बल ३८ हजार ९२४ एवढे मताधिक्क्य घेत आपला विजय निश्चित केला. पुढच्या एका फेरीतही जगताप यांनी लीड कायम ठेवत आतापर्यंतच्या दोन्ही वेळच्या मताधिक्क्याचा विक्रम मोडला. विजयानंतर जगताप यांच्या समर्थकांना फटाके फोडून मुक्त गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
आपला विजय म्हणजे विकासाची
पावती- आ. संग्राम जगताप
गेल्या १० वर्षात नगर शहराला विविध विकास कामांच्या माध्यमातून नवीन लुक देण्याचा आपला प्रयत्न आहे. या निवडणूकीत आपण हीच विकास कामे नगरकरांसमोर मांडली. त्यामुळे आपल्याला विजयाचा विश्वास होताच, प्रश्न होता तो फक्त मताधिक्क्याचा तोही यावेळी नागरिकांनी सिध्द केला. गेल्या दोन वेळच्या विजयापेक्षा हा विजय नक्कीच भारदस्त असाच आहे. मोठे लीड देऊन कार्यकर्ते व नागरिकांनी जुना विश्वास पुन्हा एकदा दाखविला आहे. ही विकासाची पावती असल्याचे असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. या विजयाबध्दल त्यांची महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व नगरकरांचे आभार मानले
0 टिप्पण्या