Ticker

6/Breaking/ticker-posts

संविधानाचा रंग बदलणारे, रक्षण काय करणार ? :आ. अमित गोरखे




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव : मागील ७० वर्षात कॉंग्रेसला जे सुचलं नाही, ते भाजपने करुन दाखवलं. माझ्यासारख्या मागास घटकातील सामान्य युवकाला विधान परिषदेवर संधी दिली तसेच रामनाथ गोविंद व द्रोपदी मुर्मू यांना महामहीम राष्ट्रपती केले. तर, लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव असलेले मिळविले. ३७० सारखे कलम हटवल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये आरक्षणाचा लाभ मिळाला. देशात भाजपाचे भक्कम सरकार आहे. राज्यात भाजपा महायुतीचे सरकार निवडुन दया. म्हणजे, विकासाची गंगा जनतेपर्यंत येईल, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे विदेशात जाऊन भाजपा सर्व आरक्षण रद्द करणार असल्याचे सांगत असून, संविधानाचा निळा रंग बदलून लाल रंगाचे संविधान दाखवत आहेत. त्यांच्यापासूनच संविधानाला खरा धोका आहे. त्यामुळे ते संविधानाचे काय रक्षण करणार ? असा खडा सवाल विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केला आहे.

     भाजपा महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ बोधेगाव, (ता. शेवगाव ) येथे आयोजित  प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी गुजरातचे आमदार महेश कासवाल, विवेक मिसाळ, चंद्रकांत काळोखे, दादाराव भोसले, बापूसाहेब भोसले, सुभाष बर्डे, बापूसाहेब पाटेकर, भीमराज सागडे, बाबा राजगुरु, अनिल वडागळे, भगवान साठे, मिनाताई कळकुंबे, सुरेश भागवत, रवी आरोळे, अस्मानराव घोरतळे, संतोष वाबळे, दिलीप विखे, शरद चाबुकस्वार, नवनाथ भवार, भाऊसाहेब पाटील, अशोक ससाणे, अशोक खिळे, संजय खेडकर, सचिन बारस्कर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष कासमभाई शेख, भाजपचे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सचिन वारकड, संदीप देशमुख, विक्रम बारवकर, सुगंध खंडागळे, लहूराव भवर, अंबादास ढाकणे, महेश घोरतळे, सुनील राजपुत, सचिन भारस्कर, कुद्दुस पठान, राजेंद्र डमाले, विक्रम देशमुख, प्रा.भाऊसाहेब मुरकुटे आदींसह महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी,  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.      


आमदार श्री.गोरखे पुढे म्हणाले, मोदी सरकारच्या काळामध्ये ३७० सारखे कलम हटवुन तिथे अनुसुचित जाती जमातींना प्रतिनिधीत्व दिले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे भारतातच नाही तर, रशियामध्ये जाऊन स्टॅच्यु उभारण्याचे काम महायुती सरकारने केले. अण्णाभाऊ साठे व  वस्ताद लुहुजी साळवे यांचे स्मारक व्हावे, अशी मातंग समाजाची मागणी होती. त्यासाठी पुण्यामध्ये ५ एकर जमीन देऊन स्मारकाचे काम पूर्ण केले आहे. डॉ. आंबेडकरांचे  लंडन येथील वास्तव्य असलेले घर मिळविले. तसेच दीक्षाभूमी व चैत्यभुमीला निधीची मोठी तरतुद करण्याचे काम भाजपा महायुतीच्या काळात झाले आहे. या गोष्टी कॉंग्रेस सरकारला कधी सुचल्यादेखील नाहीत. अण्णाभाऊ साठे रिसर्च (बार्टी) संस्थेच्या माध्यमातून हजारो मागासवर्गीय तरुण आज लाल दिव्याच्या गाड्यामधून फिरताना दिसत आहेत. रमाई योजनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबांना चांगली घरे देण्याचे काम झाले आहे. भाजपा सरकारने कुठलाही दुजाभाव केलेला नाही. 

याउलट, लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी कोर्टात जाणार्‍या कॉंग्रेस सरकारने डॉ. आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण संपुष्टात आणण्याची भाषा सुरु केली आहे. त्यामुळे डॉ.आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा जपणार्‍या समाजाने आतातरी कॉंग्रेस सरकारला ओळखले पाहिजे. त्यासाठी भाजपा महायुतीला साथ द्या. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात जनतेची काळजी घेणार्‍या आ.राजळे तिसर्‍यांदा विजयाची हॅटट्रिक साधणार आहेत. त्यांनी सर्व घटकांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत. लाडक्या बहिणी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभ्या असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले. बोधेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यासाठी मी व आ. मोनिका राजळे प्रयत्नशील असून, त्यासाठी येथे मोठा निधी उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी आश्वासित केले.

     आ. मोनिका राजळे म्हणाल्या की, माझ्या आमदारकीच्या १० वर्षाच्या कार्यकाळात मतदार संघातील प्रत्येक गावाला काही ना काही दिले आहे. सर्व जातीपातीचे लोक विकासाच्या प्रवाहात आले तर, तालुक्याला न्याय देता येतो. सर्व समाज घटकाला बरोबर जाण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते, त्याच भावनेतून आपण आजवर काम केले. म्हणुनच रस्ते, विज व पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लागले आहेत. यापुढील काळात उद्योग धंदयांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करावयाचा आहे. विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी महायुतीला मतदान करावे, अशी साद त्यांनी घातली. प्रास्ताविक राम केसभट यांनी तर,  सूत्रसंचालन सोमेश्वर शेळके यांनी केले. यावेळी अस्मानराव घोरतळे, संतोष वाबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी सभेला तालुक्यासह बोधेगाव परिसारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या