लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
श्रीगोंदा : विक्रमसिंह पाचपुते यांचा मतदारसंघातील वाढलेला जनसंपर्क व विकासासाठी लागणारा निधी खेचून आणण्याचे कौशल्य आणि जुन्या नव्या कार्यकर्त्यांच्यात मेळ घालून काम करण्यात ते यशस्वी ठरत आहेत. शांत , संयमी परंतु अभ्यासू आणि सर्वांशी मितभाषी वागणे या विक्रम पाचपुते यांच्या जमेच्या बाजु आहेत.
श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघात महायुती भाजपच्या वतीने प्रतिभाताई यांना उमेदवारी मिळाली. परंतु आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रकृती कारणाने निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी सांगून उमेदवारीसाठी विक्रम पाचपुते यांच्या नावाचा आग्रह धरला होता.
प्रतिभाताई पाचपुते यांना निवडणुकीपेक्षा आमदार पाचपुते यांच्या तब्येतीची काळजी महत्वाची वाटत असल्याने तसेच मतदारसंघात व मंत्रालयीन कामकाजासाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे तो आ.पाचपुते यांच्या अस्वास्थ्यामुळे मिळणार नसल्याने प्रतिभाताई पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उमेदवारी बाबत इच्छुक नसल्याचे सांगितले होते.
त्यात आमदार बबनराव पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांनी अचानक बैठक घेऊन एकमुखाने युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांच्या नावाची मागणी केली होती व त्यास आमदार पाचपुते यांनी ही सकारात्मक भुमिका घेत कार्यकर्त्यांची भुमिका पक्षाच्या वरिष्ठांना कळवु असे सांगितले होते. त्यानुसार विक्रमसिंह पाचपुते यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाला. भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून विक्रमसिंह यांना उमेदवारी फायनल झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे.
विक्रमसिंह यांच्या उमेदवारीचे
मतदारसंघातही नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कार्यकर्त्यांनी प्रचाराला धुमधडाक्यात प्रारंभ केला आहे.
0 टिप्पण्या