लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहिल्यानगर :शहरातील मार्केटयार्ड या कायम रहदारी असलेल्या परिसरातील महात्मा फुले चौकात एका मद्यधुंद कार चालकाने एका चारचकीसह काही दुचाकींना धडक दिली. यात एक जण जागीच ठार झाला तर दुसर्याचा रुग्णालयात मृत्य झाला आहे. तीन गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
कोतवाली पोलिसांनी या कार चालकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, रवींद्र रमेश कानडे (वय २७, रा. कानडे मळा, सोलापूर रस्ता, अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे. तर, रोहित संतोष मांजरे (वय १७, रा. वृंदावन कॉलनी), जय अशोक जाधव (रा. पारगाव, वाळूंज) व आसाराम तुळशीराम शिंदे (वय ४९, रा. कानडे मळा, सोलापूर रस्ता, अहिल्यानगर) हे तिघे जखमी गंभीर जखमी झाले आहेत. याबरोबरच अनेकांना उडविले आहे.ही घटना आज सोमवारी सायंकाळी घडली.
या बेदरकार घटनेने रस्त्यावरील पादचाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. पुण्या, मुंबईनंतर हिट अँड रनचा थरार आता नगरमध्येही पोचल्याने नगरकरांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यावर चालावे लागणार आहे.
0 टिप्पण्या