Ticker

6/Breaking/ticker-posts

आमदार मोनिकाताई राजळे यांच्यावर जमावाकडुन हल्ला; कार्यकर्त्यांच्या आरेरावितून घडला प्रकार


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
  
पाथर्डी- शिरसाटवाडी येथे मतदान केंद्राला भेट देण्यासाठी गेलेल्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्यावर जमावाकडून हल्ला करण्यात आला. तसेच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मतदान केंद्रावर राजळे यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यामधे राजळे यांच्या उजव्या खांद्याला दगड लागल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. सुरक्षा रक्षक व काही पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. दरम्यान पोलीस बंदोबस्तात त्यांना पाथर्डीत आणण्यात आले. पाथर्डीती नागेगबाबा चौकात त्यांच्या समर्थकांनी रास्तारोको आंदोलन करून घोषणा दिल्या. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. आ. राजळेंनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. दरम्यान उद्या दि.२१ रोजी पाथर्डी बंदची हाक देण्यात आली आहे. 

  याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास आमदार मोनिका राजळे व त्यांचे एक दोन सहकारी सुरक्षारक्षक असे शिरसाटवाडी येथील कार्यकर्ते बाळासाहेब शिरसाट यांच्या मोबाईल फोनवरील निरोपाने मतदान केंद्र पाहण्यासाठी तेथे गेल्या. गाडीतून उतरतानाच प्रताप काका जिंदाबाद, खासदार नवा, आमदार नवा अशा घोषणा जमावाकडून सुरू झाल्या. त्याकडे दुर्लक्ष करत आमदार राजळे मतदान केंद्रात गेल्या. तेथील कार्यकर्त्यांनी त्यांना तुम्ही बाहेर निघा, आपण मते वाटून घेऊ तुमचे कार्यकर्ता प्रतिनिधी ओळखपत्र चुकीचे आहे. अशा स्वरूपाची विचारणा केली मात्र तेथील तणावाची परिस्थिती बघत आमदार राजळे यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. मतदान केंद्रा बाहेर येताच दोन-तीन दगड आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दिशेने जमावाकडून भिरकावण्यात आले. त्यातील काही दगड लागून कार्यकर्ते जखमी झाल्यानंतर आमदार पुन्हा मतदान केंद्रात गेल्या. आमदार राजळे यांना मतदान केंद्रामध्ये सुमारे तीन तास ग्रामस्थांनी बसवून ठेवले होते.

बाहेर जमाव घोषणा देत होता, मतदान केंद्रामध्ये मतदानाला जाण्यासाठी आलेल्या चार-पाच महिला सुद्धा अडकून पडल्या. आमदारांनी पोलिसांना फोन करताच काही वेळाने पोलीस शिरसाटवाडी येथे दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य बघत त्यांनी आमदारांना सुरक्षित वाढीव बंदोबस्त तैनात केला. सुमारे तीन किलोमीटर अंतरावर गावाबाहेर आमदार समर्थकांचा जमाव घोषणा देत होता. अत्यंत तणावाच्या वातावरणात पोलिसांनी आमदारांना जुन्या शिरसाटवाडी रस्ता मार्गे पाथर्डीत सुरक्षित आणले. या घटनेचे वृत्त तालुक्यात वार्‍यासारखे सर्वत्र पोहोचले. पाथर्डी येथील नागेबाबा चौकात हजारो आमदार समर्थकांची गर्दी उसळून संतप्त जमावाने घोषणाबाजी केली. तसेचआमदार निवास स्थानाकडे जाण्याचा आग्रह धरला.

मात्र पोलिसांनी त्यांना अडवले जमाव आटोक्यात येत नाही, असे लक्षात येताच पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. तरीही ठिकठिकाणी शहरात संतप्त कार्यकर्ते प्रतिकारासाठी उभे होते. मतदार संघातील शिंगोरी, अकोले, भारजवाडी अशा ठिकाणी सुद्धा अस्थिर वातावरण असल्याच्या कार्यकर्त्यांच्या निरोपामुळे आमदारांनी तेथे भेट दिली. पाथर्डी शहर व तालुक्यात अत्यंत तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी तातडीने जमाबंदी आदेश जारी केला आहे. पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यासह सुमारे १०० पोलिसांचा फौज फाटा पाथर्डी, शिरसाटवाडी व आमदारांच्या शहरातील निवासस्थानाभोवती तैनात करण्यात आला आहे. दरम्यान या  घटनेच्या निषेधार्थ आमदार राजळे समर्थकांनी गुरुवारी पाथर्डी बंदची हाक दिली आहे.  

कार्यकर्त्यांच्या आरेरावितून घडला प्रकार
  दरम्यान या घटनेपूर्वी तालुक्यातील भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या भारजवाडी केंद्रांवर आ. राजळे व प्रभावती ढाकणे यांचीही बाचाबाची झाली होती, ही घटना दुपारी १२ वाजण्यास सुमारास घडली होती. त्यावरून ढाकणे समर्थक आधिच तनावात होते., त्यानंतर आ. राजळे यांनी सिरसाटवाडी केंद्राला भेट देण्यासाठी गेल्या. यावेळी मतदान केंद्रात प्रवेश करण्यावरून ढाकणे समर्थकांनी आ. राजळे यांच्याबाबत हरकत घेतली नाही, परंतु त्यांच्या बरोबर असणार्‍या कार्यकर्त्यांना मज्जाव केला. त्यारून राजळे समर्थकाने एकाच्या कानाखाली लगावली, अन्  या वादाची ठिणगी पडली. त्यामुळे दोन्ही समर्थक भिडल्याची घटना घडली, अशी माहिती हाती आली आहे.


 भावनेच्या भरात तरुणांकडून घडलेले कृत्य निषेधार्ह असले तरीही त्यांच्या आयुष्याचा विचार करता कुठलीही कायदेशीर कारवाई आपल्याला करायची नाही. राजळे कुटुंबाचे सर्व जाती-धर्माच्या लोकांची अत्यंत सोलोख्याचे व कौटुंबिक वातावरणाचे संबंध आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे तणाव न बाळगता सर्व
कार्यकर्त्यांनी शांतता राखावी.
   - आमदार मोनिका राजळे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या