अहिल्यानगर: विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा स्वीप समितीच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. 'ई- मतदार शपथ घ्या व शासकीय प्रमाणपत्र प्राप्त करा' असा ऑनलाइन उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभिनव लोकचळवळीत मतदारांनी सहभागी होऊन लोकशाहीचा उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर
यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील 37 लाख मतदारांपर्यंत मतदार जनजागृती अभियान पोहोचण्यासाठी ही मतदार शपथ तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे पाउण लाख जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या सहीचे ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील नागरिक सोशल मीडियावर हे प्रमाणपत्र शेअर करताना दिसत आहे. जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी या विश्वविक्रमी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली. उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, मीना शिवगुंडे, जयश्री कारले डॉ. अमोल बागुल आदींचे सहकार्य लाभले आहे.
येथून मिळवा प्रमाणपत्र
ई-मतदार शपथेची अहिल्यानगर जिल्ह्यासाठी
https://www.evoterpledgeahilyanagar.com/
ही लिंक असून या लिंकचा क्यूआर कोड देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. लिंक ओपन केल्यानंतर स्वतःचे, तालुक्याचे व गावाचे नाव ही माहिती भरल्यानंतर शपथ प्रमाणपत्र प्राप्त होते. प्रमाणपत्रावर मतदानाची तारीख 20 नोव्हेंबर, मतदान केंद्र शोधा व मतदार यादीत नाव शोधा व यासंबंधीचे दोन कोड आणि घोषवाक्य देण्यात आले आहेत. अशा पद्धतीने मतदारांना प्रमाणपत्र मिळते.
0 टिप्पण्या