Ticker

6/Breaking/ticker-posts

आ. संग्राम जगताप यांच्या विजयासाठी शहरातील व्यापारीवर्ग एकवटला..!



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
 अहिल्यानगर :  सरकार दरबारी असलेल्या वजनाचा  प्राधान्याने सकारात्मक उपयोग करून सरकारकडून मोठा विकासनिधी मंजूर करून आणला आहे. ‘मेरेपास भगवान का दिया सबकुछ है..’ त्यामुळे  फक्त आणि फक्त आपल्या मातृभूमीसाठीच सेवावृत्तीने
पूर्णवेळ काम करण्याची माझी भूमिका आहे, अशी नि: संदिग्ध ग्वाही महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी दिली.

अहिल्यानगर शहरातील पन्नासहून अधिक विविध व्यापाऱ्यांच्या संघटनांनी महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केला.  यानिमित्त मंगळवारी सायंकाळी व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी आ. जगताप  यांनी आपली भूमिका विस्तृतपणे मांडली. 

व्यासपीठावर माजी आमदार अरुण जगताप,  उद्योजक नरेंद्र फिरोदिया. संतोष बोथरा. डाळमंडई आडतेबाजार मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गांधी, सराफ संघटनेचे अध्यक्ष सुभाष कायगावकर, इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष अरविंद गुंदेचा, जॉग्री असोसिएशनचे अध्यक्ष राजू बोथरा, मिरची मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ मणियार, आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय चोपडा, क्रीडाईचे अध्यक्ष अमित मुथा, भाजी फळ फूल व्यापारी असोसिएशनचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक लाटे, उद्योजक व रामकृष्ण क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्रीगोपाल धूत, हॉटेल व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पंजाबी, अण्णासाहेब मुनोत, अनिल पोखरणा, अमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, कापड बाजार असोसिएशनचे अध्यक्ष श्याम देडगावकर, आदेश चंगेडीया, राजेश भंडारी, सिंधी समाजचे अध्यक्ष महेश मध्यन, सुरेश हिरानंदानी, प्रकाश गांधी, सावडी उपनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, अविनाश घुले, गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संतोष बोरा, जय रंगलानी, ठाकूर नवलानी, राजेंद्र चोपडा, पोपट भंडारी, अशोक भंडारी, डॉ. विजय भंडारी, भाजपाचे नेते सुवेंद्र गांधी , बाबासाहेब सानप आदींसह  सर्व संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आ.जगताप पुढे म्हणाले, नगर शहर बदलत असल्यानेच शहरीकरणाला व्यापारी, उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी गेल्या १० वर्षांपासून शहर विकासाचे नियोजन करत आहे. औद्योगिक क्षेत्र वाढून रोजगार वाढवा यासाठी विळदमध्ये ६०० एकर क्षेत्रात नव्या एमआयडीसीसाठी जागा मंजूर झाली आहे. हे नगर विकासाचे महत्वाचे पाऊल आहे. पुढील १५ ते २० वर्षाचा विचार करून शहरातील सर्व डीपी रस्त्यांचे दर्जेदार कामे सुरु आहेत. राज्याच्या नकाश्यावर विकसित नगर शहर म्हणून वेगळी ओळख निर्माण करून भविष्यात आपले शहर हे मेट्रोसिटी करायचे आहे. यासाठी सर्वांची साथ मला हवी आहे.  अहिल्यानगर मधील तब्बल ५३ व्यापारी संघटनांनी  पाठींबा दिल्याबद्दल आ. जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी नरेंद्र फिरोदिया म्हणाले, आ.संग्राम जगताप यांनी केलेल्या कामांमुळे शहराचा विकासाचा वेग वाढला आहे. क कोरोना संकटात.जगताप यांनी केलेले मदत कार्य अतुलनीय आहे. असे उत्कृष्ट काम करणारे संग्राम जगताप यांना तिसऱ्यांदा निवडणून आणण्यासाठी आपण सर्वांनी काम करावे, असे आवाहन केले. 
            
श्रीगोपाल धूत म्हणाले, आ.संग्राम जगताप यांना पाठींबा देण्यासाठी प्रथमच एव्हढ्या मोठ्या संख्यने व्यापारी एकवटला आहे,  जगताप परिवार नम्रपणे व्यापाऱ्यांच्या मागे उभा आहे. हि विजयाची पावतीच आहे.

यावेळी जयद्रथ खाकाळ यांनी आ.जगताप यांनी एमआयडीसी मध्ये दिलेल्या सुविधांची माहिती दिली. संतोष बोथरा यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीचे सूत्रसंचालन कमलेश भंडारी यांनी केले, संतोष बोथरा यांनी स्वागत केले. विपुल शेटिया यांनी  आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या