Ticker

6/Breaking/ticker-posts

अपक्षांच्या नादी लागून आपले मत वाया घालू नका; आ. मोनिका राजळे



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 शेवगाव (विशेष प्रतिनिधी) : जनतेचे प्रश्न व विकास कामांचे मुद्दे बाजूला ठेवून ही निवडणूक वेगळ्या वळणार जात आहे. ती मुद्द्यावर लढवली गेली पाहिजे, अशी आपली प्रामाणिक भूमिका आहे. मात्र, या निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच आज जातीपातीचे  व दबावाचे राजकारण केले जात आहे. कुठं आपला माणूस तर, कुठं आपला तालुका म्हणणार्‍यांना दहा वर्षात आपली माणसं आठवली नाहीत. परंतु, विधानसभेची निवडणूक लागल्यावर गुणवंतांचे सत्कार सोहळे व कुस्त्यांचे आखाडे भरवायला लागलेत, कार्यकर्त्यांना साधा काटा रुतला तरी, ते धावतपळत यायला लागलेत. हे तात्पुरते प्रेम जनतेने ओळखले पाहिजे. आता डोळ्याला रुमाल लावून डोळे पुसायला लागलेत. तुम्हाला एकच सांगते या अपक्षांच्या नादी लागून आपले मत वाया घालू नका, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.


 शेवगाव तालुक्यातील आखेगाव, शिंगोरी, थाटे, वाडगाव, मुर्शदपुर, सालवडगाव, खरडगाव येथे आ. राजळे यांचा गावभेट सवांद दौरा पार पडला. या दौर्‍यादरम्यान आखेगाव येथे झालेल्या कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी भाऊसाहेब पायघन, अर्जुन काटे, नानाभाऊ कोल्हे, मारुती पायघन, काकासाहेब खर्चन, त्रिंबक काटे, भगवान काटे, संभाजी काटे, अशोक काकडे, बाबासाहेब गोर्डे, काशिनाथ बोरुडे, कातकडे मेजर, ठबु ससाणे, मनोज पायघन, एकनाथ काटे, सुरेश गोर्डे, ज्ञानेश्वर गोर्डे, आप्पासाहेब काटे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.       

          

आ.राजळे पुढे बोलतांना म्हणाल्या की, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मला जलसंधारण तसेच ग्रामविकास विभागाकडून मोठा निधी दिला. त्यामुळे मतदारसंघातील अनेक गावातील विकास कामे मार्गी लावता आली, याचे आपल्याला समाधान आहे. मात्र,आज विरोधक जातीच्या नावाने मते मागताना दुःख वाटते. त्यांनी नेमके कोणासाठी काय केले, हे जनतेला माहीत आहे. लोकांना सर्व गोष्टी समजतात. त्यांना तुम्ही हलक्यात घेऊ नका. काहीजण तर आता आपला तालुका म्हणतात, मग गेल्या दहा वर्षे तुम्ही तालुक्यासाठी काय केले ? असा प्रश्न उपस्थित करून आ. राजळे म्हणाल्या, सेवा सहकारी सोसयाटीचे कर्ज देणार नाही, ऊस  कारखान्याला नेणार नाही, अशी दमदाटी सुरू आहे. मात्र, जनतेची अडवणूक झाली तर, मी जनतेसोबत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. सालवडगाव व शिंगोरी येथील नागरिकांनी ताजनापुर योजनेवरुन विरोधकांचा चांगलाच समाचार घेत कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी, आम्ही अपप्रचार व खोट्या आश्वासनाला बळी पडणार नसल्याचे ठणकावून सांगितले. 


विरोधकांकडून नारळ फोडून जनतेची दिशाभूल           

निवडणूक आली की, विरोधक ताजनापुर योजनेवरून राजकारण करतात. मी गेल्या दहा वर्षात प्रत्येक बजेटमध्ये या योजनेच्या दुसर्‍या टप्प्यासाठी मागणीनुसार दरवर्षी ३० ते ४० कोटी रुपयांची तरतुद केली. सन २०१८ साली ड्रिप इरिगेशनचे १२५ कोटी रुपयांचे टेंडर करुन घेतले आहे. टाकीपर्यंत पाणी आले, चाचणी घेत असताना चापडगाव परिसरातील दोन बंधारे भरुन घेतले. परंतु, ज्यांचा या योजनेची काही संबंध नाही, अशी मंडळी नारळ फोडून जनतेची दिशाभूल करत आहेत. हा खोटारडेपणा मतदारांनी ओळखला पाहिजे.आखेगावसह १३ गावांना पाणी देण्यासाठी उपमुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री यांच्यासोबत बैठक घेतली. तीन आठवड्यात तांत्रिक मान्यता मिळवून अध्यादेश काढला. दुर्दैवाने यातही राजकारण केलं गेलं, असे आ.मोनिका राजळे यांनी विरोधकाचा समाचार घेताना स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या