Ticker

6/Breaking/ticker-posts

निर्मलनगरला वंजारी समाज बांधवांचा मेळावा; आ.संग्राम जगताप यांना केला पाठिंबा जाहीर


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहिल्यानगर: सावेडी उपनगरासह  शहराच्या विविध भागात आमदार संग्राम जगताप यांनी अनेक कामे केली असून काही सुरू आहेत. आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही माजी जि.प.सदस्य सचिन जगताप यांनी दिली. 

निर्मलनगर येथे वंजारी समाजाचा मेळावा शनिवार दि.10 नोव्हेंबर रोजी वंजारी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री. संत भगवान बाबा मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.   या मेळाव्याला सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, शिक्षक वृंद, वधू वर मंडळाचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, महिला भगिनी, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी हभप राम घुले महाराज,  हभप रवींद्र आव्हाड महाराज यांनी समस्त बांधवांना श्री.संत भगवान बाबा श्री.संत वामनभाऊ यांच्या जीवन चरित्राचा प्रवास कथन केला. समाज संघटित करण्यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी किती त्याग केला याबद्दल माहिती दिली.
       
 या मेळावात नगर शहराचे कार्यसम्राट आ. संग्राम जगताप यांच्या विकास कामांसाठी त्यांचे असलेले योगदान पाहून सर्व समाजातील जनतेला बरोबर घेत शहर विकासासाठी असलेले व्हिजन, त्यांची दूरदृष्टी, इच्छाशक्ती प्रबळ असल्याने भविष्यात पुन्हा नगर शहरात विकासासाठी त्यांना पुन्हा आमदार होणे हे आमचे ध्येय आहे. त्यामुळे समस्त वंजारी समाज बांधवांनी भगवान बाबा मंदिरात बाबांच्या साक्षीने आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा  जाहीर केला. या निर्णयाचे  त्यांचे बंधू जि.प. सदस्य सचिन जगताप यांनी स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या