लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
खरवंडी कासार:
आधी दिवाळी भगवानगडाची, मग आपल्या घरची.. हा निर्णय घेऊन खरवंडी कासार ग्रामस्थानी भगवान गडावरील अन्न छत्रात दिवाळीच्या पगंतीचा स्वयपांक व फराळ वाजत गाजत पोहच केला. संत भगवान बाबाच्या समाधीला व विजयी पाडुरंगला नैवेद्य अर्पण केल्यानंतर गडावरील अन्नछत्रात दिवाळी पगंतीला सुरुवात झाली.
श्रीक्षेत्र भगवान गडावर दररोज येणाऱ्या भावीकासाठी भगवानगडावरील अन्नछत्रामध्ये अखंडपणे विनामुल्य महाप्रसाद देण्यात येतो . या महाप्रसादासाठी गडाच्या वतीने प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गावाना वार व दिनांक ठरवून दिलेले आहेत. ठरलेल्या दिनांक व वारादिवशी त्या गावातुन बाजरी व ज्वारीच्या भाकरी ,चपात्याचा प्रसाद वाटपासाठी ग्रामस्थ गावात जमा करतात व भगवान गडाच्या गाडीने गडावर नेतात. भगवान गडाच्यावतीने गरम भात भाजी अन्नछत्रात तयार करून
अखंड महाप्रसाद वाटप होते .
दि. १ रोजी खरवंडी ग्रामस्थासाठी भाकरीची तारीख असते, महिन्याच्या १ तारखेला खरवंडी गाव भाकरी देत
असते. परंतु या वेळेस १ तारखेला दिवाळी आल्याने खरवंडी ग्रामस्थानी खरवंडी येथिल महादेव मंदीरात ग्रामवर्गणी मधुन दिवाळी पगंतीसाठी दोनशे किलो बुंदीचे लाडु, दोनशे किलो चिवडा, चपाती ,पापड, कुरडाई असा स्वयपांक तयार करून हा फराळ वाजत गाजत मिरवणूक काढत भगवान गडावर पोहच केला.
खरवंडीकरांची संत भगवानबाबा वर अपार श्रध्दा आहे. भगवान गडावर चालु असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज मंदीरासाठी सर्वात जास्त म्हणजे १ कोटी ६५ लाख देणगी देण्याचा मानही खरवंडी करालाच आहे . खरवंडी व भगवानगडाचे नाते हे अतुट आहे. त्यामुळे भगवानगडाची गोड दिवाळी साजरी करून खरवंडी ग्रामस्थानी आधी भगवान गडावर दिवाळी साजरी केली व नंतर घरची दिवाळी, असा पायंडा पाडला, त्याबद्दल ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे
0 टिप्पण्या