Ticker

6/Breaking/ticker-posts

भाजपमध्येच उमेदवारीसाठी मारामाऱ्या ; अॅड. ढाकणे यांची मार्मिक टोलेबाजी..!


लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पाथर्डी- सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यावर या मतदारसंघात इच्छुकांच्या गर्दीला जत्रेचे स्वरूप येते, मात्र समाजाविषयी त्यांचे उत्तरदायित्व काय? हे त्यांनीच एकदा तपासून जनतेपुढे पुढे जावे, असे आव्हान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी  लोकप्रतिनिधीसह कार्यकर्त्यांना दिले. 

भाजपमधील अंतर्गत घडामोडींविषयी, मीडियाशी संवाद साधताना, ते  म्हणाले, तो त्यांचा अंतर्गत मामला, आपण त्यावर कितीही बोलले तरी कमीच..परंतु बोलायच  म्हणता तर, त्यांच्याच पक्षातले अनेक जण एकमेकांचे कपडे उतरवतात, त्यामुळे आपण काय बोलावे.? असा मार्मिक सवाल उपस्थित केला.
        
 ढाकणे पुढे म्हणाले, पूर्वी पक्ष मर्यादित होते आता पक्षांची संख्या वाढली, त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली महत्त्वकांक्षा वाढल्या की अनेक इच्छुक तयार होतात मात्र त्यांनी जनता महत्त्वाची आहे हे लक्षात घ्यावे. तालुक्यात भारतीय जनता पक्षात काय चालले, याच्याशी आपल्याला देणेघेणे नाही. मात्र महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारे वातावरण सध्या सुरू असून हे  जनतेला मान्य नाही. त्यामुळे सत्तारूढ पक्षाच्या विरोधात जनमत आहे.

 फोडाफोडीचे राजकारण सामान्य लोकांना मान्य नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा कुरूप झालेला आहे. प्रत्येक उमेदवारांनी आपण कशासाठी उमेदवारी करतोय त्याचे आत्मचिंतन करणे आवश्यक आहे मी गेल्या 32 वर्षांपासून निवडणुका लढवत व  पहात आलोय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळातही आपण जिल्ह्यात त्या पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी कार्यरत होतो, मात्र इतकी विदारक राजकीय परिस्थिती आपण कधीही पाहिली नाही. इच्छुक उमेदवारांनी निश्चितपणे लढावे तो त्यांचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. केवळ त्यांनी आपली नैतिकता तपासावी आणि जनतेपुढे जावे. या मतदारसंघात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर अनेकांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली. मात्र त्यानंतर सोयीस्करपणे स्वर्गीय मुंडे साहेब,माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा विसर कसा पडला? त्याचे अनेक उदाहरणे असून ते योग्य वेळी आपण  जनतेपुढे मांडू, असे सांगून चौफेर टोलेबाजी केली. 

 यावेळी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, योगेश रासने, देवा पवार अरविंद सोनटक्के आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या