Ticker

6/Breaking/ticker-posts

अण्णासाहेब शेलार यांना श्रीगोंदेतून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर


लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहिल्यानगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर झाली आहे.

  संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची तिसरी यादी आत्ताच जाहीर केली. त्यामध्ये श्रीगोंदे मतदारसंघातून शेलार यांचे उमेदवारी नाव आहे.

 दरम्यान अण्णासाहेब शेलार हे श्रीगोंदा मतदार  मतदारसंघात गेल्या 40 वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांनी महिनाभरापूर्वी  कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन  कोणत्याही परिस्थितीत थांबायचे नाही ,तसेच माघारही घ्यायची नाही,प्रसंगी  अपक्ष निवडणूक रिंगणात उतरवून लढाई करायचीच असा निर्धार व्यक्त केला होता.

 त्या दृष्टीने विविध पक्षांकडेही उमेदवारीसाठी चाचपणी करण्यात येत होती. तथापि वंचित बहुजन आघाडीने शेलार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून अहिल्यानगर जिल्ह्यात विरोधी सर्वच पक्षांना एक प्रकारे जोरदार धक्का दिल्याचे मानले जाते. 

 श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षाकडून राहुल जगताप यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे. तर पाचपुते यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या अनुराधा नागवडे यांनी आक्रमक होत पक्षाला जय महाराष्ट्र करून उमेदवारीसाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. याच दरम्यान वंचितने आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर करून त्यामध्ये श्रीगोंदा मतदारसंघातून अण्णासाहेब शेलार यांचे नाव जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला आहे. याबाबत शेलार यांचेही संपर्क होऊ शकला नाही  परंतु त्यांनी  उद्याच कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन  त्यामध्ये पुढील दिशा स्पष्ट करणार असल्याचे समजते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या