Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगावमधील आ . राजळे यांचे तिकीट न बदलल्यास पराभव अटळ : मुंढे





     

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव : (विशेष प्रतिनिधी) : कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. अजून वेळ गेलेली नाही. भाजपा नेतृत्वाने २२२, शेवगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना दिलेले तिकीट बदलावे, अन्यथा, पराभव अटळ आहे, असा गर्भित इशारा भाजपाचे प्रदेश सचिव अरुण मुंडे यांनी दिला.

       

शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघात आ. राजळेंविषयी जनमानसात तसेच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष व नाराजी आहे. विधानसभेसाठी मी स्वतः व ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड इच्छुक आहोत. तशी मागणी यापूर्वी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे. दोघांनीही कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन मते जाणून घेतली आहेत. पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर करून तिकीट बदलावे. दौंड व माझ्यात सुसंवाद आहे, असे श्री मुंडे म्हणाले. 


     आ.राजळे यांना यंदाची निवडणूक सोपी नाही. त्यांचा पराभव अटळ असून, त्या तिसऱ्या क्रमांकावर जातील. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने शेवगाव विधानसभा मतदार संघाचे तिकीट बदलावे. अन्यथा,  भाजपावर पश्चातापाची वेळ येईल, असे श्री. मुंडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले

.

      पत्रकार परिषदेस बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब डोंगरे, शब्बीर शेख, अंकुश कुसळकर, गुरुनाथ माळवदे, मयूर हुंडेकरी, भूषण देशमुख, बाळासाहेब कोळगे, दिगंबर काथवटे, ज्ञानेश्वर राशिनकर, रामभाऊ पोटफोडे, बबन भुसारी, पप्पू केदार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या