Ticker

6/Breaking/ticker-posts

नेवासा भाजपाचे बाळासाहेब मुरकुटे हाती बांधणार घड्याळ ?





लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 
नेवासा : नेवासा विधानसभेची जागा शिंदे यांच्या शिवसेनेला गेली असून एका मोठ्या उद्योग्यपतीचे नाव नक्की झाले असताना त्या विरोधात भाजपच्या माजी आमदाराने बंड पुकारले आहे. भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर देखील ही जागा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली. त्यामूळे संतापलेल्या मुरकुटे यांनी हाती घड्याळ बांधण्याचा निर्धार केला आहे. 

शनिवारी त्यांनी  अजितदादा यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली,  यावेळी  ही जागा राष्ट्रवादीकडे घेतल्यास मी भाजपला राम राम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करतो, अशी खुली ऑफर दिली. तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान रविवारी विठ्ठलराव लंघे यांच्या समवेत शिष्टमंडळच दादांच्या भेटीला घेऊन गेले. शिवसेनेने ठरविलेला उमेदवार नवखा असून त्यांना तालुक्यातील गावे सुद्धा माहीत नाहीत, कार्यकर्ते माहीत नाही, ते कधीही लोकांच्या संपर्कात नसतात, तालुक्यातील जनता त्यांना ओळखत नाही, अशा तक्रारी या दोघांनी केल्या. मला राष्ट्रवादीकडून उमेदवारी द्या, अशी जाहीर मागणी माजी आमदार मुरकुटे यांनी केली. त्यावर अजितदादांनी  "पहातो जरा, काही करता येत का",  असा सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आहे. 

आमदार शंकरराव गडाख यांच्या विरोधातील सर्व इच्छुक मुंबईत ठाण मांडून आहेत, आपणच कसे योग्य आहोत, असे नेत्यांना पटवीत आहेत. नेवासाची जागा महायुतीत कुणाला मिळते याची  उत्सुकता वाढली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या