( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहिल्यानगर: पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे संभाजीराव पालवे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करुन राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघातील भाजपाचे उमेदवार माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांना पाठिंबा दिल्याने या भागात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.
राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांचा काल राहुरी येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी पाथर्डीचे माजी सभापती व आमदार प्राजक्त तनपुरे यांचे समर्थक संभाजीराव पालवे यांनी आपल्या पाथर्डी तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यासह भाजपमध्ये प्रवेश केल्याने या भागात राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) मोठे खिंडार पडले आहे. मागील निवडणुकीत पालवे यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे काम करुन या भागावर शिवाजीराव कर्डीले यांचे वर्चस्व असताना आमदार तनपुरे यांना या भागात शिवाजीराव कर्डीले यांच्या बरोबरीने मते मिळवुन दिली होती. संभाजीराव पालवे हे गेल्या एक वर्षांपासुन नाराज होते.
वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाचा सुमारे १७ वर्षे पालवे यांनी पाठपुरावा करुन या कामास मंजुरी मिळविली होती. या योजनेच्या प्रत्यक्ष कामास आता सुरुवात झाली असुन या योजनेचा फायदा वांबोरी चारी योजनेपासुन वंचीत राहिलेल्या १२ गावांना मिळणार आहे. त्यामुळेच संभाजीराव पालवे यांचे अनेक समर्थक या भागात आहेत. पालवे यांच्या भाजप पक्षप्रवेशाने या भागात भाजपाचे उमेदवार माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांची ताकद वाढली आहे. महायुतीच्या सरकारने गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांना मोफत वीज, मुलींना मोफत शिक्षण ,महिला भगिनींना लाडकी बहीण योजना, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा मिळवून दिला. असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या महायुती सरकारने घेतले .त्यामुळे सध्या तरी शेतकरी सर्वसामान्य जनता महिला भगिनी खुश आहेत. सर्वसामान्य व गोरगरीबासाठी हे सरकार काम करीत असल्याने आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता भाजपमध्ये प्रवेश केला असून पाथर्डी तालुक्यातील 39 गावांमधून माजी मंत्री कर्डिले यांना मोठे मताधिक्य देऊ, अशी ग्वाही पालवे यांनी दिली.
‐------‐‐-------------------------------------
आमदार प्राजक्त तनपुरे मागील विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवारी करण्यास देखील तयार नव्हते, त्यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांची आम्ही भेट घेऊन प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी करण्यास भाग पाडले .पाथर्डी तालुक्यातील 39 गावात प्राजक्त त्यांची मतदारांना ओळख करून देण्याचे काम आम्ही केले. परंतु गरज संपल्यानंतर कार्यकर्त्यांना पद्धतशीर बाजूला करणे, हा त्यांचा स्वभाव. त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देणार.आहे .
-संभाजी पालवे
माजी सभापती
0 टिप्पण्या