Ticker

6/Breaking/ticker-posts

घुले पाटील दांपत्याचे मोहटादेवी दर्शन


लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

           ( प्रशांत गोसावी )
   श्रीक्षेत्र मोहटादेवी : शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. चंद्रशेखर घुले पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. राजश्रीताई घुले पाटील यांनी शारदीय नवरात्रोत्सवातील तिसऱ्या माळेची पर्वणी साधत शनिवार दि.५ रोजी सकाळी ११ वाजता श्रीक्षेत्र मोहटे, (ता. पाथर्डी) येथील जगदंबा मातेची खणा नारळाने ओटी भरत मनोभावे दर्शन घेतले. देवस्थानचे पुजारी भूषणदेवा साखरे यांनी पौरोहित्य केले.
     शारदीय नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने चंद्रशेखर घुले पाटील मित्र मंडळाच्या वतीने मोहटादेवी गडाच्या पायथ्याशी भाविक - भक्तासाठी रात्रंदिवस चहापाणी तसेच फराळाची मोफत व्यवस्था करण्यात आली असून या स्टॉलचे उद्घाटन श्री.आदिनाथ महाराज दहिफळे यांच्या हस्ते श्री जगदंबा माता प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. श्री मोहटादेवी दर्शनानंतर श्री. व सौ. घुले तसेच शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचा श्री जगदंबादेवी देवस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, विश्वस्त शशिकांत दहिफळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


      याप्रसंगी जेष्ठ नेते काकासाहेब नरवडे, बाळासाहेब ताठे, संजय कोळगे, सतीश पाटील लांडे, विजयराव देशमुख, नंदकुमार मुंडे, बबनराव भुसारी, अंबादास कळमकर, शरद जोशी, महेंद्र घनवट, वैभव पवार, अजिंक्य लांडे, तुषार लांडे तसेच अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या