लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : गुरुवार दि.२४ रोजी गुरुपुष्यामृत योगाची पर्वणी साधत ७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज निर्णय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी प्रसाद मते यांच्याकडे दाखल केले. निवडणूक प्रक्रिया पार पाडणे कामी त्यांना तहसीलदार प्रशांत सांगडे व उद्धव नाईक सहाय्य करत आहेत.
काल उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये विद्यमान आमदार मोनिका राजीव राजळे (भाजपा), हर्षदा विद्याधर काकडे (अपक्ष), प्रतापराव बबनराव ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), प्रभावती प्रतापराव ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), माजी आमदार चंद्रशेखर मारुतराव घुले पाटील (अपक्ष), माजी सनदी अधिकारी दिलीप कोंडीबा खेडकर (अपक्ष), रत्नाकर जावळे (अपक्ष) आदी सात जणांचा समावेश आहे.
आ. राजळे यांनी शेवगावच्या वैशंपायन नगरमधील श्रीदत्त देवस्थानात तर, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी ज्येष्ठ बंधू माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील यांना सोबत घेत एस. टी. स्टँड चौकातील मनोकामना सिद्धिविनायक देवस्थान तसेच वैशंपायन नगरमधील श्रीदत्त देवस्थानात सद्गुरु श्रीदत्तात्रेय व योगतज्ञ प. पू. दादाजी वैशंपायन यांच्या चरणी माथा टेकवला. त्यानंतर त्यांनी निवडक कार्यकर्त्यांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल केले. तर, जनशक्ती विकास आघाडीच्या हर्षदा काकडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
0 टिप्पण्या