लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पाथर्डी: (विक्रम केदार)- माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्या अनेक आठवणी आपल्या सोबत आहेत,योग्य संत व योग्य संगत लाभल्यास जीवन पालटते. बबनरावांना संतश्रेष्ठ भगवानबाबा व वामनभाऊ महाराजांचा सहवास लाभला. वातावरण बदलत असते पुढची पुण्यतिथी प्रतापराव ढाकणे यापेक्षा मोठी साजरी निश्चितपणे करतील अशा सूचक शब्दात भगवानगडाचे मंहांत नामदेव शास्त्री महाराज यांनी वक्तव्य केले.
माजी केंद्रीय मंत्री स्व.बबनराव ढाकणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रामकथेचा समारोप व ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांच्या काल्याचे कीर्तन तसेच शेवगाव- पाथर्डी तालुक्यातील संत महंतच्या पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार निलेश लंके,दिनकर महाराज अंचवले,अनिल वाळके महाराज,ज्ञानेश्वर महाराज कराळे,उद्धव महाराज सबलस,जगन्नाथ महाराज शास्त्री,मारुती झिरपे महाराज,धर्मराज फुनदे महाराज,हनुमान शास्त्री महाराज,रामनाथ शास्त्री महाराज,गहिनीनाथ खेडकर महाराज,दादा महाराज नगरकर,आदिनाथ महाराज शास्त्री,रामगिरी महाराज,योगेश्वर शास्त्री महाराज,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे,सिद्धेश ढाकणे, प्रणाली ढाकणे, तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे,केदारेश्वरचे उपाध्यक्ष माधव काटे, राधाताई सानप महाराज यांच्यासह शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉ.नामदेव शास्त्री म्हणाले,बबनराव ढाकणे यांचे जीवन वारकरी संप्रदायाला धरून होते. संत भगवानबाबा व संत वामनभाऊ महाराज यांचा त्यांच्या हयातीत त्यांना सहवास लाभला ही अतिशय मोठी बाब आहे. वातावरण बदलत असते,त्यामुळे द्वितीय पुण्यतिथी प्रतापराव ढाकणे यापेक्षाही जोमाने साजरी करतील.
ज्ञानेश्वर कराळे महाराज म्हणाले,सन 1972 च्या दुष्काळात राष्ट्रसंत तनपुरे महाराजांनी बबनराव ढाकणे यांच्यावर दुष्काळ निवारण व अन्नछत्रांची जबाबदारी सोपवली होती. तब्बल दोन वर्ष मला त्यांच्या सोबत काम करता आले त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय विशाल विचार शैलीचे होते साधी रहाणी,जनहिताचा विचार व विकासाची दृष्टी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू होते,तसेच त्यांनी कधीही कोणत्याही समाजात भेद निर्माण होईल अथवा त्या दृष्टीने पाहिले नाही. त्यामुळेच पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग हा बबनरावांचा त्यांच्या राजकीय जीवनात बालेकिल्ला समजला जायचा.
खासदार निलेश लंके म्हणाले, स्व.बबनराव ढाकणे कडून संघर्षची प्रेरणा घेऊनच आपण राजकीय जीवनात कार्य करत आलो आहे. त्यांच्या नेतृत्वाची दूरदृष्टीची साक्ष देणारे अनेक विकास कामे शेवगाव व पाथर्डी तालुक्यात आजही साक्ष देत आहेत. स्वर्गीय बबनराव प्रमाणेच प्रतापराव राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करत असून एकदा त्यांना संधी देऊन पहा त्यांच्यातील अभ्यासूपणा आणि विकासाची दूरदृष्टी या मतदारसंघाला निश्चितपणे फायदेशीर ठरणारी ठरेल यात शंका नाही.आज संत पूजनाच्या कार्यक्रमातून त्यांना वारकरी संप्रदायाचा मिळालेला आशीर्वाद निश्चितपणे फळाला येईल याची मला शाश्वती आहे. प्रस्ताविकात प्रतापराव ढाकणे यांनी स्वर्गीय बबनराव ढाकणे यांच्या जीवनाला उजाळा दिला. स्वागत केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी केले तर सूत्रसंचालन करून आभार गणेश सरोदे व अर्पणा शेळगावकर यांनी मानले.
0 टिप्पण्या