शेवगाव( प्रतिनिधी ) : २२२, शेवगाव विधानसभा मतदारसंघात दि. २० नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी दाखल ३६ पैकी २७ अर्ज छाननीत वैध ठरले असून, ९ जणांचे अर्ज विविध कारणांनी अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांनी पत्रकारांना दिली.
अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये प्रभावती प्रतापराव ढाकणे, नामदेव मनोहर ठोंबरे, धीरज मोतीलाल बताडे, हरिभाऊ दादा काळे, नवनाथ वामन कवडे, सुहास झुंबर चव्हाण, अमोल सूर्यभान पेटारे, अर्जुन कुंडलिक वारे व उद्धव तुकाराम माने या ९ जणांचा समावेश आहे.
0 टिप्पण्या