Ticker

6/Breaking/ticker-posts

पतीच्या यशासाठी पत्नीचे संपर्क अभियान...


   

लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
  शेवगाव  : पतीच्या यशात पत्नीचा अदृश्य हात असतो, असे नेहमी कौतुकाने बोलले जाते. याचा प्रत्यय विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने येत आहे. शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील हे निवडणुकीच्या आखाड्यात ताकतीने उतरणार आहेत. त्या अनुषंगाने पतीच्या विजयासाठी सौ.घुले यांनी कंबर कसली आहे. सध्या त्यांनी मतदारसंघातील गावागावात प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संपर्क अभियानास प्रारंभ केला आहे. या अभिनव अभियानास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
     सुसंस्कृत, अभ्यासू तसेच विचारी कुटुंब म्हणून घुले परिवाराकडे पाहिले जाते. ते सहसा कुणाचीही उणीधुणी काढण्याच्या फंदात पडत नाही. यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत पतीला यश मिळावे. त्यांचा विजय व्हावा आणि ते विधानसभेत पोहोचावेत यासाठी सौ.घुले गेल्या अनेक महिन्यापासून पुढे सरसावल्या असून मतदारांच्या संपर्कात आहेत. आपल्या हक्काचा व कामाचा प्रतिनिधी म्हणून भाऊंना संधी द्या, असे आवाहन त्या मतदारांना करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या