पाथर्डी-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आज विधानसभेसाठी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून प्रतापराव ढाकणे यांचे नाव घोषित झाल्यामुळे ढाकणे समर्थकांनी पाथर्डी व शेवगाव मध्ये फटाके आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.
पाथर्डी शहरातील नाईक चौक येथे नाईक चौकात केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, डॉ.राजेंद्र खेडकर,गहिनीनाथ शिरसाठ,अर्जुन धायतड्यक,योगेश रासने,देवा पवार,अतिश निरळी यांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना ऋषिकेश ढाकणे, म्हणाले, शरदचंद्र पवार यांनी या मतदारसंघात आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही निश्चितपणे सार्थ ठरवून दाखवू, मागच्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाची झालेली विल्हेवाट यापुढे आम्ही सुधारून दाखवू आज उमेदवारी जाहीर झाली आहे,विजय पण आम्हीच मिळू या तालुक्यातील या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेमध्ये प्रतापराव ढाकणे यांच्या विषयी वेगळी सहानुभूती निर्माण झालेली आहे त्या जोरावर आमचा विजय निश्चित आहे.
गहिनीनाथ शिरसाट म्हणाले प्रतापराव ढाकणे मग 30 वर्षांपासून राजकीय संघर्ष करत आहे. यंदा मात्र चित्र पालटताना दिसत आहे पक्षाने उमेदवार दिल्याबद्दल आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांचे आभार मानतो व त्यांना विजय मिळवून देण्यासाठी जीवाचे रान करू.
0 टिप्पण्या