लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहिल्यानगर: जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदार संघात उमेदवारी वाटपाच्या शेवटच्या टप्प्यात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडवून राष्ट्रवादीला(अजितदादा गट) बाय-बाय करून अनुराधा नागवडे यांनी दोन दिवसात वेगाने हालचाली केल्या. महाआघाडीचा पर्याय निवडून संपर्क साधला. आधी शरदचंद्र पवार गटाकडे आणि नंतर लगोलग शिवसेनेकडे ( ठाकरे गट) संपर्क प्रस्थापित करून प्रवेश आणि तत्काळ उमेदवारी पटकाविली. त्यांचा हा राजकीय मुत्सद्दीपणा जिल्ह्यात चर्चेचा ठरला आहे.
4 दिवसांपूर्वी भाजपची उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर महायुतीतील ही जागा भाजपकडे गेल्याचे स्पष्ट झाले. येथून भाजपने आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली. त्याचक्षणी नागवडे गटात संताप अन अस्वस्थता पसरली. तत्काळ नागवडे दाम्पत्यांनी मातोश्री गाठले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी काल चर्चा करून लगेच आज प्रवेश आणि एबी फॉर्मसह उमेदवारीही पटकावली. अत्यंत कमी वेळेत घडविलेली ही राजकीय घडामोड जिल्ह्याचे लक्ष वेधून गेली. यामध्ये उपनेते साजन पाचपुते यांनी 'किंगमेकर'ची भूमिका बजावली. येथे पुन्हा एकदा काका पुण्यातील राजकीय वादाने निर्णय वळण घेतले.
श्रीगोंदा मतदारसंघात आतापर्यंत तब्बल 7 वेळा बबनराव पाचपुते यांनी आमदारकी पटकावली तर शिवाजीराव नागवडे यांना दोन वेळा संधी मिळाली हेच शल्य ओळखून 2014 पासून नागवडे कुटुंब आमदारकीसाठी प्रयत्नशील आहेत .
तथापि 2014 ला राहुल जगताप यांच्यासाठी थांबावे लागेल तर 2019 ला पक्षशिस्त पाहुन बबनराव पाचपुते यांचा प्रचार करावा लागला. अशा राजकीय अनिश्चितेच्या गर्तेत नागवडे कुटुंब विधानसभा निवडणुकी पासून दुरावले. नागवडे गटाला आपल्या राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करण्याची नितांत गरज ओळखून 2019 पासूनच अनुराधा नागवडे यांना आमदारकीचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्यात आले. तसा संपर्क आणि कार्यकर्त्यांचा संच व विविध शैक्षणिक संस्था साखर कारखाना आदी बाबी त्यांच्यासाठी जमेच्या आहेत. आणि त्यामुळेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष ठेवून वाटचाल सुरू होती .
त्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी नागवडे यांनी अजितदादा पवार गटात प्रवेश केला. तथापि जागा वाटपात ही जागा भाजपला गेली. अखेर उमेदवारीच्या शेवटच्या टप्प्यात वेगवान हालचाली करत शिवसेनेची उमेदवारी पटकावली.आता (उबाठा) शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत जिल्ह्यातील पहिली उमेदवारी अनुराधा नागवडे यांच्या रूपाने श्रीगोंद्याला मिळाली. आता दोन महिलांमधील ही राजकीय लढत रंगतदार होणार आहे
0 टिप्पण्या