अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीची भाजपाने पहिली यादी कालच जाहीर केल्यानंतर आता इतर पक्षांच्याही याद्या हळूहळू बाहेर पडू लागल्या असून आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी सायंकाळपर्यंत हाती येणार आहे .दरम्यान या यादीत शेवगाव -पाथर्डी मतदार संघातून अॅड. प्रताप ढाकणे आणि अकोले मतदारसंघातून अमित अशोक भांगरे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्या दिनांक 22 पासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपल्या याद्या आता सोडायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये भाजपाने राज्यातील 99 उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली . त्यामध्ये शेवगाव- पाथर्डी मतदारसंघातून विद्यमान आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
तर आता राष्ट्रवादीकडून( शरदचंद्र पवार) प्रताप ढाकणे यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत मिळाल्याने शेवगाव -पाथर्डी मतदारसंघात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. अॅड. ढाकणे यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके यांच्या विजयासाठी मोठे परिश्रम घेतले होते. तसेच मतदारसंघात पदयात्रा, मेळावे घेऊन घरोघर जनसंपर्क प्रस्थापित केला आहे. त्यामुळे तुतारीकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. आता राजळे विरुद्ध ढाकणे ही परंपरागत लढाई पुन्हा एकदा रंगणार आहे.
दरम्यान भाजपा आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील हेही या निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची जोरदार चर्चा असून आता त्यांच्या भूमिकेकडे अवघ्या मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाच्या यादीत बाबत कमालीची उत्सुकता असून 39 उमेदवारांच्या संभाव्य यादीत जिल्ह्य़ातील
उमेदवार असे:
1) शेवगाव -पाथर्डी - प्रतापराव ढाकणे
2) अकोले - अमित भांगरे
3) कर्जत- जामखेड- रोहित पवार
4) राहुरी - प्राजक्त तनपुरे
5) पारनेर - राणीताई लंके
0 टिप्पण्या