लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहिल्यानगर : गेले महिनाभरापासून सुरू असलेल्या जागा वाटपाचा तिढा सोडविण्यात अखेर महायुतीला यश आले असून अपेक्षेप्रमाणे त्यांनी विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी आज (दि.20) रविवार रोजी नुकतेच जाहीर केली आहे.
त्यानुसार अहिल्या नगर जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवारांना पहिल्याच यादीत स्थान मिळाले आहे. यामध्ये शिर्डीतून अपेक्षेप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील, राहुरीतून शिवाजीराव कर्डिले, शेवगाव मधून श्रीमती मोनिका राजीव राजळे, कर्जत -जामखेड मधून प्रा. शिंदे आणि श्रीगोंदेमधून श्रीमती प्रतिभा बबनराव पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपकडून जिल्ह्यात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या आठवडय़ात जागा वाटप आणि उमेदवारी निश्चितीच्या कामाला गती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी नुकतीच दिल्ली वारी केली होती. त्यानुसार भाजपाचे राष्ट्रीय महा सचिव अरुण सिंह यांनी राज्यातील 99 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. त्यामुळे चर्चेला आज पूर्णविराम मिळाला.
शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे, शेवगाव-पाथर्डीतून मोनिका राजळे, कर्जत-जामखेडमधून राम शिंदे, श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते, राहुरीमधून शिवाजीराव कर्डिले यांनी पाहिल्याचं यादीत स्थान पटकावले आहे.
या उमेदवारी यादीवर नाराज इच्छुकां चि भूमिका लवकरच स्पष्ट होईल. शेवगाव-पाथर्डी, श्रीगोंद्यातील भाजप कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या दोन्ही मतदारसंघात नाराज मंडळी उमेदवारी दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या