Ticker

6/Breaking/ticker-posts

टाकळीमानुर येथे अॅड प्रतापराव ढाकणे यांच्या उमेदवारीचे जंगी स्वागत


लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पाथर्डी-राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार )   शेवगाव- पाथर्डी मतदारसंघातून प्रतापराव ढाकणे यांचे नाव घोषित केल्याबद्दल  टाकळी  मानूर येथे ढाकणे समर्थकांनी  फटाके फोडून स्वागत करण्यात आले. 

     पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर येथील बाजार तळावर माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ, माजी सरपंच बप्पासाहेब शिरसाठ, लक्ष्मण ठोंबरे, संदीप शिंदे, मच्छिंद्र मानकर, अमोल गाडे, शहादेव शिरसाठ, संजय ठोंबरे ,अर्जुनराव शिरसाट,  बाळासाहेब नागरे, राजेंद्र शिरसाठ, राजेंद्र गाडे , प्रदीप मोरे , रावसाहेब फुलमाळी, उद्योजक पिंटू सुरवसे, अशोक फुलमाळी, आकाश शिंदे, आदींनी एकच जल्लोष केला. 

 यावेळी पत्रकारांशी बोलताना गहिनीनाथ शिरसाट म्हणाले, प्रतापराव ढाकणे गेले  30 वर्षांपासून राजकीय संघर्ष करत आहेत. यंदा मात्र चित्र पालटले आहे. पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांचे आभार मानतो.  व  जीवाचे रान करून ढाकणे यांना विजय मिळवून देऊ, असा आत्मविश्वास व्यक्त केला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या