Ticker

6/Breaking/ticker-posts

लोकनेते मारुतराव घुले पाटील 'ज्ञानेश्वर'चे यंदा १३ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट


लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
भेंडा, ता. नेवासा ( विशेष प्रतिनिधी ) : यंदाचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबर पासून सूरु होत असून कारखान्याने दररोज ११ हजार टन ऊस तोडणीचे नियोजन केलेले आहे. मार्च अखेर १२ ते १३ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा माजी आ. पांडुरंग अभंग यांनी केले.

       भेंडा, ( ता. नेवासा ) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ५१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपन कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.  नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते व कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी श्री. अभंग बोलत होते.
 कारखान्याचे जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, डॉ. क्षितिज घुले पाटील, काशिनाथ नवले, काकासाहेब शिंदे, दिलीपराव लांडे पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

       प्रारंभी संचालक श्री. शिवाजीराव कोलते  व सौ. निर्मला कोलते, बॉयलर अटेंडन्ट श्री. बापूसाहेब म्हस्के व सौ. संगीता म्हस्के  या उभयतांचे हस्ते  विधिवत बॉयलर पूजा करण्यात आली. यावेळी  संचालक प्रा.नारायण म्हस्के, भाऊसाहेब कांगुणे, जनार्धन कदम, अशोकराव मिसाळ, दादासाहेब गंडाळ, पंडितराव भोसले, जनार्दन कदम, गोरक्षनाथ गंडाळ, बबनराव भुसारी, सखाराम लव्हाळे, दीपक नन्नवरे, लक्ष्मण पावसे, विष्णू जगदाळे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, कामगार संघटनेचे सचिव संभाजीराव माळवदे, बबनराव धस, दत्तात्रय काळे,  बाळासाहेब नवले, गणेश गव्हाणे, अशोक वायकर, कचरदास गुंदेचा, संजय कोळगे, मिलिंद कुलकर्णी, अंबादास कळमकर, रामभाऊ पाउलबुद्धे, विजय कावरे, बलभीम फुलारी, गुलाबराव आढागळे, शंकर निकम, किसन यादव, शरद मिसाळ, शिवाजीराव भुसारी, भाऊसाहेब आगळे, राजेंद्र चामुटे, सोमनाथ गव्हाणे,  डॉ. सुधाकर लांडे,  देविदास आगळे, राजेंद्र परसैया मधुकर वावरे, बाबूलाल पटेल, अशोकराव खांबट, एकनाथ कसाळ, ज्ञानदेव घोरतळे, विजयकुमार नवले, आबासाहेब ताकटे, भारत साबळे, शिवाजीराव भुसारी, अंबादास कळमकर, कचरदास गुंदेचा, दत्तात्रय विधाटे, हुकूमबाबा नवले, हरिभाऊ नवले, उद्धव नवले, पंढरीनाथ फुलारी, बाळू वाघडकर, सतीश लांडे, अशोक दुकळे, संतोष म्हस्के, विश्वनाथ मते, त्रिंबक जाधव, काकासाहेब काळे, विजय कावरे , अशोक काळे, भगवान धुत, कारखान्याचे तांत्रिक सल्लागार एस.डी.चौधरी, एम.एस.मुरकुटे, महेंद्र पवार, मुख्य अभियंता राहुल पाटील, नंदकुमार चोथे, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, प्रशासकिय अधिकारी कल्याणराव म्हस्के, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे आदी उपस्थित होते. संचालक बबनराव भुसारी यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या