नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीची घोषणा केली गेले महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला..
निवडणूक आयोगाने यावेळी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार महाराष्ट्रात बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होईल संपूर्ण राज्यातील या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन जाहीर केला जाणार आहे .
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत 2019 मध्ये भाजप व शिवसेना एकसंघ युती करून लढले होते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी आघाडी होती त्यावेळी भाजपने 105 जागा जिंकल्या होत्या त्यामुळे भाजप 105 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता यावेळी राष्ट्रवादीला 54 तर काँग्रेसला अवघ्या 44 जागांवर समाधान मानावे लागले होते.
एकसंघ लढलेल्या भाजप आणि शिवसेनेत
मुख्यमंत्री पदावरून बिनसले आणि राज्यात नवीन समीकरण पुढे आलं. पहिले अडीच वर्षे शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस अशी आघाडी होऊन सत्ता स्थापन झाली. पुढे शिवसेनेत उभी फुट पडल्याने हे सरकार कोसळलं. त्यामध्येच भाजपने अजित दादांना बरोबर घेऊन पहाटेचे शपथ विधी पार पडला होता. या घडामोडी होऊन शेवटी राष्ट्रवादीही फुटली व पुढे भाजपा शिवसेना शिंदे गट आणि अजित दादा राष्ट्रवादी असं राजकीय समीकरण उदयास आलं, आणि अशा रीतीने सत्ता नाट्याचे हे पाच वर्ष संपले
26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचे मुदत संपत आहे. त्याआधी निवडणूक होऊन सरकार स्थापन करणे गरजेचे असल्याने या निवडणुका जाहीर झाल्या आहेत या निवडणुकीत यावेळी मात्र शिवसेनेच्या दोन सेना आणि राष्ट्रवादीच्या दोन गट तयार झाले त्यामुळे शिवसेना उभा ठाक राष्ट्रवादी शरद चंद्र पवार व काँग्रेस अशी महागारी महाआघाडी विरुद्ध भाजप प्लस शिंदे गट प्लस अजितदादा गट राष्ट्रवादी यांची माहिती असा सामना रंगणार आहे गेले महिनाभरापासून याच निवडणुका कधी जाहीर होणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली होती
निवडणुकीचा कार्यक्रम असा :
*दिनांक 22 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
*दिनांक 29 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख
दिनांक 30 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी
दिनांक 4 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
दिनांक 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान
23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी व
विधानसभा निवडणुकीचा निकाल
0 टिप्पण्या