लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
आष्टी : तालुक्यातील कर्हेवाडी येथील रहिवासी मुक्ताबाई तुकाराम सांगळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमई त्यांचे वय-85 वर्षे होते. त्यांच्या मागे 3 मुले,2 मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गेले काही दिवसापासून त्या आजारी होत्या, त्यांचेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या आणि मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या़. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. आजिनाथ तुकाराम , नवनाथ तुकाराम व भानुदास तुकाराम सांगळे यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पार्थिवावर शनिवारी कर्हेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या