लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पाथर्डी दि (१२)
पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी टेंभे वस्ती येथील ग्रामस्थांचे रस्ता खुला करण्यासाठी दोन दिवसापासून सुरू असलेले उपोषण अखेर गुरुवार दि १२ सप्टेंबर रोजी लाडजळगाव जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या मध्यस्थीने अखेर मागे घेण्यात आले.
पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी (टेंभे वस्ती) येथील ग्रामस्थांनी २८ ऑगस्ट रोजी पाथर्डी तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिले होते , त्यात एकनाथवाडी येथील टेंभी वस्तीवरील रस्ता मंगुसवाडे येथील प्रकाश खेडकर व सूर्यभान खेडकर या दोन व्यक्तींनी अडवलेला आहे, या रस्त्यावर सदर इसम हे कोणतेही काम करून देत नाहीत, त्यामुळे आम्ही शासनाच्या विविध योजनां पासून वंचित राहिलो आहोत. टेंभी वस्तीवर सुमारे ७० घरे असून आमची लहान मुले ही शाळेपासून वंचित आहेत. रात्री एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्यांना दोन किलोमीटरवर उचलून न्यावे लागते. आत्तापर्यंत दोन दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत तरी आम्हाला शासनाने हा रोड तत्काळ खुला करून द्यावा. तसे न झाल्यास आम्ही १० सप्टेंबर रोजी कुटुंबासह मुंगसवाडे शिवावर टेंभे वस्ती कडे जाणाऱ्या रोडवर आमरण उपोषण करणार असल्याचे म्हटले होते.
त्यानुसार सदरील टेंभे वस्तीवरील कुटुंब गेल्या दोन दिवसांपासून उपोषणास बसले होते. पण प्रशासकीय पातळीवर त्यांची कोणीही दखल घेत नव्हते.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी तत्काळ उपोषण स्थळी जाऊन संबंधित ग्रामस्थांची भेट घेऊन पाथर्डी चे नायब तहसीलदार रावसाहेब गुंजाळ, पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर ,तलाठी गवई एस एच, तलाठी एन एस, धोत्रे ए ए, ग्रामसेवक सुनील वाघ, मंडळ अधिकारी बडे एन व्ही, या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून व त्यांना घटनास्थळी बोलावून या रस्त्याच्या संदर्भात चर्चा करून तत्काळ रस्ता खुला करण्याची मागणी केली.
त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून सदरील रस्ता हा आठ दिवसात खुला करून देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हर्षदाता काकडे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेत असल्याचे टेंभे वस्ती वरील ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी अमोल खेडकर, नितीन घुले, मल्हारी खेडकर, राजेंद्र खेडकर, राजेंद्र आंबेकर, शहादेव घुले, विठ्ठल चेमटे, महादेव खेडकर, भास्कर खेडकर, विष्णू खेडकर, गोरख खेडकर, चंद्रकांत खेडकर, भाऊसाहेब आंबेकर, दत्तू चेमटे, शिवाजी आंबेकर, बाबासाहेब आंबेकर, गयाबाई खेडकर, आशाबाई खेडकर सहित आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या