Ticker

6/Breaking/ticker-posts

धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे खपवून घेणार नाही - डॉ. सुजय विखे पा.








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

संगमनेर :

मागील ७० वर्षात शिर्डी मतदारसंघातील कोणत्याही जाती अथवा धर्माला संरक्षणाची गरज पडली नाही. मात्र आज असं काय झालं की? प्रत्येकाला आपलं अस्तित्व धोक्यात वाटू लागलं आहे. महाराष्ट्र आणि शिर्डी मतदारसंघाबाहेर काय चालू आहे, त्याबद्दल मला काही माहित नाही. परंतु शिर्डी मतदारसंघात आपण सर्व जण एक आहोत. त्यामुळे धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नसल्याचा इशारा डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.


संगमनेर तालुक्यातील आश्‍वी बुद्रुक येथे युवक कार्यकर्त्याशी संवाद साधताना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. अशोकराव जऱ्हाड, नवनाथ ताजणे, भीमा शिंदे, अनिल कंगणकर, विजय म्हसे, अनिल म्हसे, संजय गायकवाड, सुनील जऱ्हाड, अनिल जऱ्हाड, विशाल वाकचौरे, महेंद्र जऱ्हाड, भाऊसाहेब खेमनर, सतीश म्हसे, प्रवीण गायकवाड, शरद चंद, गणेश जऱ्हाड, आनंद बालोटे, सुभाष होडगर, राजेंद्र होडगर, विशाल जऱ्हाड, प्रमोद जऱ्हाड, संपत भुसाळ आदिंसह मोठ्या प्रमाणात युवक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.



डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की, ज्या दारुड्याला घरात आणि गावात कोणी विचारत नाही. तो मोबाईलवर एखादे स्टेटस ठेवतो आणि आपण गाव बंद ठेवतो. आपण सुशिक्षीत असूनही भरकटत चाललोय का? तुमचां शिक्षण घेऊन काय उपयोग झाला असा सवाल डॉ. विखे यांनी उपस्थित करत डॉक्टर असून जर मी भेदभाव मिटवू शकलो नाही तर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे मतदारसंघातील सामाजिक सलोखा बिघडणार नाही आणि मुलीची सुरक्षितता भंग होणार नाही यांची दक्षता घेण्याचे आवाहन केले. 



‘जनसेवा युवा मंच अँप’बाबत माहिती देताना ते म्हणाले की, या अँपचा उपयोग युवकांचे संघटन, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये युवकांना रोजगाराच्या संधी, विविध अर्ज तसेच गणेश मंडळाची नोंदणी करण्यासाठी प्रामुख्याने उपयोग होणार आहे. १५ सप्टेंबर पर्यत यांची नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करताना नोंदणी करणारे युवक माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार असल्याचे सांगितले. तसेच सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांनासाठी संघटनेत काम करणाऱ्या युवकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही डॉ. विखे यांनी दिली.


एकाचं घरातील उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्रात दोन वेगवेगळे पक्ष चालवत असल्याचे सांगून कार्यकर्त्यानी आता एकमेकांच्या तक्रारी करण्यात वेळ न घालवता विविध योजना घरा-घरापर्यत पोहचवाव्यात. जेष्ठ कार्यकर्त्यानी देखील मनाचा मोठेपणा दाखवून तरुण कार्यकर्त्याशी स्पर्धा न करण्याचा सल्ला दिला आहे.



स्वं. बाळासाहेब विखे पाटील, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि राजीव गांधी यांसारख्या दिग्गज नेत्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र आश्‍वी बुद्रुक येथे माझा पराभव झाल्याचा जल्लोष करण्यात आला. यांची खंत बोलून दाखवताना मला काम करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसल्याचे डॉ. सुजय विखे म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या