लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : दि. ४ :
अगदी तोंडावर येऊन ठेपलेला गणेशोत्सव व इतर उत्सव सर्व समाज बांधवांनी एकोप्याने व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन शेवगाव विभागाचे डीवायएसपी सुनिल पाटील यांनी केले.शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
उपस्थित शांतता कमिटी सदस्य व गणेशोत्सव पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, आगामी गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद हे सण सर्व धर्मातील समाजबांधवांनी एकोप्याने व शांततेत साजरे करावेत.कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे वर्तन कोणीही करू नये. ' एक गाव एक गणपती ' या संकल्पनेला प्राधान्य द्यावे तसेच या सण-उत्सवाच्या माध्यमातून जातीय सलोखा, सामंजस्य वृद्धिंगत करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवावे.यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.सण, उत्सवाच्या दरम्यान काही अनुचित प्रकार आढळून आल्यास तत्काळ पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी.
बैठकीस पंचायत समितीचे माजी सभापती अरुण पाटील लांडे, संजय फडके, डॉ.निरज लांडे पाटील, दत्तात्रय फुंदे, मनिष बाहेती, संजय नांगरे, नवनाथ कवडे, तुषार पुरनाळे, सतिष मगर, कमलेश लांडगे, राहुल वरे, राहुल सावंत, बाळासाहेब डाके यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करावे
गणेशोत्सव मंडळाने रीतसर पोलिसांकडून परवानगी घ्यावी.गणपती जवळ मंडळाचा कार्यकर्ता रात्री संरक्षणासाठी असावा.वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, असे मंडप टाकावेत, महावितरणकडून परवानगी घेऊन वीज कनेक्शन घ्यावे, विसर्जन वेळी वाहनांची योग्य तपासणी करून घ्यावी. सर्वांनी शांततेत गणेशोत्सव साजरा करावा.
-समाधान नागरे
(पीआय, शेवगाव पोलीस स्टेशन)
0 टिप्पण्या