Ticker

6/Breaking/ticker-posts

गोरक्षनाथ बर्डे यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 शेवगाव : जिल्हा परिषदेच्या वतीने दिले जाणारे सन २०२४ चे ' जिल्हा शिक्षक पुरस्कार ' जाहीर झाले असून, यंदा हा पुरस्कार शेवगाव तालुक्यातील ' धाकटी पंढरी ' श्रीक्षेत्र वरुरचे सुपुत्र व क-हेटाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ भिकाजी बर्डे यांना जाहीर झाला आहे.


जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने श्री.बर्डे यांच्या नावाची शिफारस मान्यतेसाठी नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे केली आहे. 


     श्री.बर्डे यांची एकूण सेवा ३२ वर्षे असून त्यांनी आजपर्यंत भेर्डापूर, (ता.श्रीरामपूर), जेऊर, तेलकुडगाव, (ता.नेवासा) तसेच जोहरापूर, चापडगाव व तळणी (ता.शेवगाव) येथे उपाध्यापक म्हणून ज्ञानदानाचे उत्कृष्ट काम केलेले आहे.विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ख्याती आहे.सध्या ते क-हेटाकळी येथे मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत.


मिशन आपुलकी, लोकसहभागातून शैक्षणिक साहित्य निर्मिती, वृक्षारोपण आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी शाळा व विद्यार्थ्यांचा विकास साधला आहे तसेच वैयक्तिकरित्या १५ वेळा रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे.श्री.बर्डे यांना पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या