Ticker

6/Breaking/ticker-posts

शुभांगी शेलार व उमेश घेवरीकर यांना राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर

 

















लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

   


शेवगाव : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत दिले जाणारे सन २०२३-२०२४ चे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाले असून, त्यात शेवगाव जिल्हा परिषद मराठी मुली शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती शुभांगी भाऊसाहेब शेलार व शेवगावच्या नामांकित पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूलचे सह शिक्षक उमेश गोपीनाथ घेवरीकर यांचा समावेश आहे.पुरस्काराबाबतची घोषणा महाराष्ट्र शासनाचे उपसचिव तुषार महाजन यांनी केली असून, शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला या पुरस्काराचे मुंबई येथे शानदार वितरण होणार आहे.


     समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या तसेच त्यांच्या यथोचित गुणांचा  सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतात.राज्य शिक्षक पुरस्कार योजना सन १९६२- ६३ पासून राज्यात कार्यान्वित असून ती शालेय शिक्षण विभागामार्फत राबविली जाते.


     सन २०२१- २२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारित करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने दिले जातात. या पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपये आहे तसेच राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ४ सप्टेंबर २०१४ च्या शासन निर्णयान्वये ठोक रक्कम एक लाख रुपये अदा करण्यात येते.


      राज्य पुरस्कार जाहीर झालेल्या श्रीमती शेलार व श्री. घेवरीकर या शिक्षकांनी आपल्या शाळेत सुजान व संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याबरोबरच शाळा विकासासाठी अनेकाविध उपक्रम राबवले आहेत. समाज व शाळेच्या भौतिक विकासातही त्यांचे मोठे योगदान आहे.दोघांनाही साहित्य,नाट्य व  कला क्षेत्राची विशेष आवड आहे. त्यांची राज्य पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांचेवर सर्व स्तरावरून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या