Ticker

6/Breaking/ticker-posts

नवरात्रीनिमित्त आय.एस.डी.टी.त "घागरा" महोत्सवाचे आयोजन : देशमुख


लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अ.नगर: (अहिल्यानगर): " येत्या नवरात्रीच्या निमित्ताने येथील आय.एस.डी.टी.या संस्थेत दि. ३० सप्टेंबर ते दि.५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत "घागरा" महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे," अशी माहिती संस्थेच्या संचालिका पूजा देशमुख यांनी दिली.

आय.एस.डी.टी. ही संस्था एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई यांच्याशी संलग्न असून संस्थेमार्फत डिप्लोमा इन टेक्सटाईल अँड फॅशन डिझाईन तसेच डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन हे दोन वर्षाचे पदविका अभ्यासक्रम चालविले जातात. संस्था मागील २० वर्षापासून यशस्वीपणे कार्यरत असून यावर्षी फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने "घागरा" महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

मागील काही वर्षापासून नगर शहरात नवरात्रीचे नऊ दिवस व त्यानंतरही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत विविध ठिकाणी गरबा कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. तरुण पिढी या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होत असल्याचे आढळून आले आहे. नवरात्रीच्या काळात गरबा दांडिया नृत्यात सहभागी होण्यासाठी विशेष पेहरावाची व विशिष्ट दागिन्यांची आवश्यकता असते. तरुणाईची ही गरज ओळखून आय.एस.डी.टी. संस्थेने याबाबत पुढाकार घेतला असून दि.३० सप्टेंबर २०२४ ते दि.५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आय.एस.डी.टी., निर्मल चेंबर्स मागे, होमो केअर लॅब समोर, लाल टाकी, अहमदनगर येथे घागरा महोत्सव आयोजित केला आहे . संस्थेच्या विशेष दालनात विविध डिजाईनचे घागरे व त्यासाठी आवश्यक असलेली ज्वेलरी यांचे सादरीकरण करण्यात येत आहे. 
तरी इच्छुकांनी वरील कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत घागरा दालनास भेट द्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या