Ticker

6/Breaking/ticker-posts

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण"योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अ.नगर दि. २६- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज (दि. २७ सप्टेंबर) रोजी शिर्डी येथे महिला सशक्तीकरण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

  महिलांना दरमहा आर्थिक लाभ देणारी तसेच कुटुंबात महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११ लाख ५२ हजार ४५६ महिलांचे अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. शासनाने सुरू केलेल्या या योजनेमुळे महिला भगिनींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील १४  तालुक्यांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून योजनेला गती मिळाली. या योजनेंतर्गत अकोले तालुक्यात ७६ हजार ४७१ महिलांचे अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले.  संगमनेर तालुक्यात १ लाख ३१ हजार ८८, कोपरगाव ७६ हजार १०८, श्रीरामपूर ७३ हजार ३६३, नेवासा ९४ हजार ७८२, शेवगाव ६० हजार ४४७, पाथर्डी ६३ हजार ८११, जामखेड ४१ हजार ७६५, कर्जत ६० हजार ५२८, श्रीगोंदा ७९ हजार १२३, पारनेर ६९ हजार १४२, राहूरी १ लाख २६ हजार १६१, राहाता ८५ हजार २३० तर अहमदनगर तालुक्यामध्ये १ लाख १४ हजार ४३७ महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. 

योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७२० महिलांना २४७ कोटी ४१ लाख ६० हजार रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आला आहे. उर्वरित पात्र महिलांना पुढील टप्प्यात जुलै २०२४ पासून दरमहा रुपये १ हजार ५०० प्रमाणे तीन महिन्यांचा लाभ देण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या