Ticker

6/Breaking/ticker-posts

' न भूतो न भविष्यती ' अशा दिमाखदार शिवमहापुराण सोहळ्याची सांगता


लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन नेटवर्क )

   ( प्रशांत गोसावी )
    शेवगाव : लोकनेते (स्व.) मारुतराव घुले पाटील यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त घुले कुटुंबीयांनी पवित्र व शुद्ध अंतकरणाने आयोजित केलेल्या शिव महापुराण कथेवर शेवगावकरांनी भरभरून प्रेम केले. आपल्या प्रेमाची शिदोरी घेऊन मी परतत आहे. असेच प्रेम कथा आयोजक श्री. चंद्रशेखर घुले पाटील व त्यांच्या कुटुंबावर करावे. कथा आयोजन व उत्कृष्ट नियोजनाबद्दल मी त्यांचा सत्कार करत आहे. यापुढेही सत्काराचे हार त्यांच्या गळ्यात पडावेत. त्यांच्या हातून समाजाची व धर्माची सेवा घडावी. या कामासाठी त्यांना परमेश्वराने उदंड आयुष्य प्रदान करावे, असे आशीर्वाद कथा प्रवक्ते श्री. समाधान महाराज शर्मा यांनी दिले.
 शेवगावच्या खंडोबा मैदानावर आयोजित शिव महापुराण कथा सप्ताहातील अखेरचे ७ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. वरूण राजाच्या साक्षीने श्री. शर्मा महाराज यांनी अत्यंत जड अंतकरणाने शेवगावकरांचा निरोप घेतला. यावेळी श्रोत्यांचे डोळे अक्षरशः पाणवले. यावेळी फटाक्याची मोठी आतषबाजी करण्यात आली. ' न भूतो न भविष्यती ' असा हा कथा सोहळा संपन्न झाला. कथा समारोपाच्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रोत्यांना शिवपार्वती कॅलेंडर तसेच बुंदी प्रसाद पाकिटाचे वाटप करण्यात आले.

     श्री. शर्मा महाराज पुढे म्हणाले, महा शिवपुराण कथा मी आपल्या अंतकरणात पोहोचवली आहे. तिला मोठी करा तसेच शुद्ध जगा व आचरण चांगले ठेवा. भोलेनाथ आपल्यावर निश्चित कृपादृष्टी करतील. बारा ज्योतिर्लिंगाचा व उपलिंगाचा महिमा वर्णन करताना ते म्हणाले, भारत देशाच्या चारही बाजूंनी महादेव विराजमान आहेत. भोलेनाथ किंवा कोणत्याही देवाची श्रद्धेने आराधना करा. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. मुलींच्या जन्मदराबाबत त्यांनी चिंता व्यक्त व्यक्त करून ते म्हणाले, मुलींना गर्भात मारू नका. मुली वाचल्या तरच आया जन्माला येतील. आया व गाई वाचल्या पाहिजेत.
     माजी आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील म्हणाले, शिव महापुराण कथेच्या माध्यमातून शेवगाव - पाथर्डीच्या जनतेने घुले कुटुंबावर भरभरून प्रेम केले. श्रोत्यांच्या प्रचंड उपस्थितीने आम्हाला बळ व प्रेरणा मिळाली. आगामी पाच वर्षात अशाच कथेच्या आयोजनासाठी श्री‌. चंद्रशेखर घुले यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी पाठिंबा द्यावा. कथा सांगता समारंभाला वरुण राजाने  लावलेली हजेरी आपल्यासाठी शुभशकुन आहे.

     माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील म्हणाले, कथा नियोजन समितीच्या अथक परिश्रमामुळे श्री. समाधान महाराज शर्मा यांच्या रसाळ अमृतवाणीतून शिव महापुराण कथा यशस्वी झाली आहे. अनेक अदृश्य हात  या कामी आले. अखेरच्या श्वासापर्यंत शेवगाव -  पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा तसेच जनतेच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा आपला संकल्प आहे. त्यासाठी प्राणाची आपल्याला पर्वा नाही. विधानसभेत जाण्यासाठी मतदारांनी संधी द्यावी, असे आवाहन करून त्यांनी सर्वांप्रती ऋण व्यक्त केले.

     मा. आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील व चंद्रशेखर घुले पाटील, सौ.  राजश्रीताई घुले पाटील, डॉ. क्षितिज घुले पाटील, विजयराव देशमुख, संजय फडके, सचिन लांडे , मनेष बाहेती, सतीश लांडे , बापूसाहेब गवळी, महेश शेटे तसेच कथा उत्सव कमिटीचे पदाधिकारी, सदस्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. प्रास्ताविक दीपक कुसळकर यांनी तर, आभार प्रदर्शन राहुल देशमुख यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या