Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्य मंत्रिमंडळाच्या "जोर 'दार' बैठका" निर्णयांचा धडाका..! परंतु ग्रंथालयांचा सोईस्कर विसर..?


लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई/अ.नगर :
सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीच वार घोंघावतय,  लवकरच आचारसंहिता लागून निवडणुका जाहीर होऊ शकतात. या पार्श्‍वभूमीवर  राज्य मंत्रिमंडळाच्या "जोर 'दार' बैठका" व निर्णयांचा धडाका सूर आहे.  आजच्या ( दि.23 ) बैठकीत तब्बल 24 निर्णय एकाच दिवशी घेण्यात आले. परंतु गत अधिवेशनात आश्वासन देऊनही राज्यातील ग्रंथालयांच्या प्रश्नांचा 
सोईस्कर विसर..? पडला की काय? असा सवाल ग्रंथालय कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

विधानसभेच्या अनुषंगाने राजकीय पक्ष,  नेते, कार्यकर्ते आणि प्रशासन कामाला लागले आहे.  त्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सरकारने लाडकी बहीणसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याबाबत चांगली चर्चा चालू आहे. तथापि दिवस कमी असल्यामुळे सर्व घटकांना न्याय कसा देता येईल , या दृष्टिकोनातून  मंत्रिमंडळाच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे.  आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकाच दिवशी तब्बल 24 निर्णय घेण्यात आले.  मात्र मागील अधिवेशनात ग्रंथालय कर्मचारी, कार्यकर्ते यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा सरकारला सोईस्कर विसर पडला. त्यामुळे ग्रंथालय चळवळीत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. 

पुरोगामी महाराष्ट्रात केवळ आश्वासना शिवाय आजपर्यंत फारसे काहीही पदरि न पडलेल्या ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या बाबत सरकारलाकडे सातत्याने पाठपुरावा केला. सन 2012 पासून ग्रंथालयाचे अनुदानवाढ, वर्गवाढ , नवीन मान्यता,  कर्मचाऱ्यांना सेवा शर्ती आदी प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत. 

याबाबत भाजपाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी लक्ष् घालून 60 टक्के अनुदान वाढ दिली.  एवढा  अपवाद सोडला तर गेले 15 वर्षापासुन ग्रंथालये अडगळीत पडली आहेत. ( यातील 40 टक्के अद्यापही मिळाले नाही)  त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या 12500 ग्रंथालयाचे  प्रश्न  तात्काळ मार्गी लावून त्यावर अवलंबून असलेल्या सुमारे लाखावर नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
................................................
ना. चंद्रकांत दादांचे आश्वासन
2 जुलै  24 रोजी  विष्णुपंत पवार,  संजय कराळे (पाथर्डी) नामदेव गरड (शेवगाव) पनाजी कदम (कर्जत) सुरेंद्र शिंदे (पारनेर)  संदीप पठाडे मच्छिंद्र पाटील आठरे विलास  कांबळे आदींनी 
आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली ना. पाटील यांची मुंबईत  भेट घेऊन  ग्रंथालये  आणी ग्रंथालय  कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नसंदर्भामध्ये   ना. पाटील यांचेशि चर्चा झाली. 
यावेळी नाम. पाटील यांनी, अनुदानातील उर्वरित 40 % वाढ तातडीने देण्यात येईल. तसेच केंद्र सरकारकडून मिळणारे 400 कोटी तातडीने उपलब्ध करून सर्व वर्गाच्या वाचनालयाना त्याचे समप्रमाणात वितरण करू.  दर्जावाढ  आणि नव्या वाचनालयांना  मान्यता देणे यासंदर्भात  लवकरच घोषणा करण्यात येईल, असे सांगितले होते. अधिवेशनातही हीच बाब स्पष्ट केली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या